प्रभाग 17 मध्ये इस्माईल शेख यांच्या सक्रियतेची चर्चा; नागरिकांशी संवाद वाढवण्यावर भर .
धाराशिव | प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक 17 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) गटाचे अधिकृत उमेदवार इस्माईल शेख यांच्या वाढत्या सक्रिएतेची परिसरात चर्चा सुरू आहे. अलीकडच्या काळात नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत विविध विषयांवर माहिती घेण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून आल्याचे स्थानिकांनी सांगितले.
शेख यांनी वार्ताहरांशी बोलताना म्हटले की, “इथून पुढे वार्डातील आरोग्यविषयक प्रश्न, रस्त्यांची स्थिती, गटार व्यवस्था, प्रकाशयोजना आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या सुख–सुविधांच्या बाबींवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीची अडचण समजून घेण्यासाठी वैयक्तिक लक्ष देत संवाद वाढवण्याचा माझा प्रयत्न राहील,” असे ते म्हणाले असल्याची माहिती मिळाली.
प्रभाग 17 मधील नागरिकांमध्ये सध्या स्थानिक प्रश्नांना कोणत्या पद्धतीने प्राधान्य दिले जावे, याबाबत चर्चेला वेग आला असून या संवादातून मिळणाऱ्या सूचनांचा आगामी नियोजनात उपयोग होईल, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केली आहे.





















Total views : 4449