“मानवतेच्या धावण्याचा हृदयस्पर्शी क्षण; धाराशिव सभेत ऐकू आला मदतीचा आणि एकतेचा भावनिक स्वर”
सभेला उपस्थित नागरिकांनी या सर्व भावनिक प्रसंगांना आणि प्रामाणिक मनोगतांना उत्स्फूर्त प्रतिसाद .
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परविन खलिफा कुरेशी या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह विविध प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य सभा आज पार पडली. या सभेस राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष व आमदार शशिकांत शिंदे उपस्थित होते.
सभेत सर्वसामान्य जीवन जगणारे, शांत स्वभावाचे अण्णासाहेब अनिल बरंगे यांनी आपल्या आयुष्यातील एका अत्यावश्यक क्षणाची आठवण सांगताच वातावरणात भावनिक शांतता पसरली.
अण्णासाहेब म्हणाले “रात्री पावणे तीनच्या सुमारास एक गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. अशा वेळी कोणतेही गणित न मांडता मदतीला धावून येणारा माणूस म्हणजे खलिफा कुरेशी. त्या क्षणी त्यांनी तातडीने ॲम्बुलन्सची व्यवस्था करून दाखवलेली माणुसकी मी विसरणार नाही.”
त्यांनी ही घटना सभेत स्वतःहून मांडत जात, धर्म, भेदभाव यांच्या पलीकडे जाऊन मानवतेने केलेल्या मदतीचे महत्व अधोरेखित केले.“माणसाच्या दुःखाच्या वेळी पुढे करणारा हातच समाजाला खरा आधार देतो,” असे ते म्हणाले.
यानंतर आपल्या भाषणात प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी समाजात निस्वार्थपणे मदत करणाऱ्या व्यक्तींचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले —
“धाराशिव शहराला विकासासाठी मनापासून काम करणारी, सर्वांना समान न्यायाने साथ देणारी नेतृत्वशैली हवी आहे. नगराध्यक्ष पदाची उमेदवार परविन खलिफा कुरेशी यांच्या पाठीशी धाराशिव शहरातील जनतेने खंबीरपणे उभे राहून त्यांना काम करण्याची संधी व आशीर्वाद द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.”
सभेला उपस्थित नागरिकांनी या सर्व भावनिक प्रसंगांना आणि प्रामाणिक मनोगतांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संपूर्ण कार्यक्रमातून मानवतेचा संदेश, सामाजिक एकता आणि सकारात्मकता प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचली.
–





















Total views : 4449