कळंबमध्ये महायुतीची शक्ती सभेला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद .
सभेला प्रमुख मान्यवर म्हणून मा. ना प्रतापजी सरनाईक, परिवहन मंत्री व पालकमंत्री, धाराशिव यांनी संबोधित केले .
कळंब | प्रतिनिधी
शिवसेना-भाजपा-रिपाई (आ) महायुतीच्या नगरपरिषद निवडणूक कार्यक्रमाला कळंब शहरात शनिवार, दि. २९ नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला. स्वतंत्रवीर सावरकर पुतळा, मेन रोड येथे झालेल्या या ‘जय सभेत’ महायुतीच्या नगरसेवक उमेदवारांसह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
सभेत प्रमुख मान्यवर म्हणून मा. प्रतापजी सरनाईक, परिवहन मंत्री व पालकमंत्री, धाराशिव मा. राणाजगजितसिंह पाटील, आमदार, तुळजापूर विधानसभा
राजाभाऊ ओव्हाळ, महाराष्ट्र जॉईंट सेक्रेटरी, रिपाई (आ)अजित दादा पिंगळे, नेते, शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
यांची उपस्थिती होती.
दरम्यान , मान्यवरांनी शहरातील चालू घडामोडी, स्थानिक पातळीवरील विकासाची गरज आणि नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे महत्त्व याविषयी आपापले विचार मांडले. निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचे भान ठेवत, भविष्यकालीन योजनांवर कोणतेही आश्वासन न देता त्यांनी प्रशासनिक समन्वय, प्रामाणिक जनसंपर्क आणि सु-संवादाची आवश्यकता अधोरेखित केली.
चौकट : – कळंबच्या विकासाच्या गरजा अग्रक्रमावर .
या सभेत शहरातील पायाभूत सुविधा, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित विविध मुद्द्यांवर मान्यवरांनी वस्तुनिष्ठपणे चर्चा केली. कळंब शहराने मागील काही वर्षांत भोगलेल्या अडचणी, नागरिकांचे अपेक्षित बदल आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका या विषयांवर सविस्तर विवेचन करण्यात आले.
कोट : – सभेला नागरिकांची उल्लेखनीय उपस्थिती
आजच्या सभेला विविध प्रभागांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शहरातील प्रश्नांवर सविस्तर चर्चा व माहिती मिळत असल्याने नागरिकांनीही समाधान व्यक्त केले. निवडणूक प्रक्रियेत शांतता, शिस्त आणि परस्पर आदर राखण्याचे आवाहन सभेतून करण्यात आले.
























Total views : 4449