प्रभाग १४-ब मध्ये डोर-टू-डोर संपर्क मोहिम वेगात ; शेख शौकत नुरुद्दीन नागरिकांच्या प्रश्नांना ऐकून घेत पुढील नियोजन .
संवादातून स्थानिक समस्या अधिक स्पष्टपणे पुढे .
धाराशिव / प्रतिनिधी
प्रभाग क्रमांक १४-बमध्ये गेल्या काही दिवसांपासून डोर-टू-डोर प्रचाराची जोरदार मुसंडी मारत प्रचार सुरू आहे. स्थानिक भागातील समस्यांची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने शेख शौकत नुरुद्दीन यांनी घराघरांत भेट देत नागरिकांशी संवाद साधण्याची मोहीम सुरू ठेवली आहे.
नुरुद्दीन यांनी प्रत्येक गल्ली, वस्ती आणि वाड्यात भेट देऊन रहिवाशांच्या अडचणी शांतपणे ऐकून घेतल्या. विशेषत: तुटके रस्ते, नालेसफाईची अपुरी व्यवस्था, पावसाळ्यात येणारी तीव्र दुर्गंधी, आरोग्यसेवांचा अभाव आणि पाणीपुरवठ्याशी संबंधित अनेक तक्रारी नागरिकांनी मांडल्या.
काही ठिकाणी महिलांनी घरगुती पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला तर युवकांनी रस्त्यांच्या चाळण झालेल्या अवस्थेकडे लक्ष वेधले. ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य तपासणी शिबिरे वाढवण्याची मागणीही नुरुद्दीन यांच्यासमोर मांडली.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शौकत नुरुद्दीन यांनी प्रत्येक प्रश्नाची नोंद घेऊन त्यावर तातडीने पावले उचलण्यासाठी संबंधित विभागांशी संपर्क साधण्याचे आश्वासन दिले. “एवढ्या बारकाईने आमचे मुद्दे ऐकून घेणारा कोणी पहिल्यांदाच आलाय,” असे अनेक रहिवाशी सांगताना दिसले.
दरम्यान,प्रभागात सुरू असलेल्या या प्रत्यक्षपणे संपर्क मोहिमेमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून, या संवादातून स्थानिक समस्या अधिक स्पष्टपणे पुढे येत आहेत.
























Total views : 4449