प्रभाग २ (अ) मध्ये प्रचाराच्या उत्साहाची झळाळी ..!!
आकाश तावडे डोर–टू–डोर संवादातून विकासाचा नवा अजेंडा पुढे.
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग २ (अ) मध्ये उमेदवार आकाश मधुकरराव तावडे यांनी विकासनगर, शांतिनिकेतन आणि गांधीनगर भागात घरोघर पोहोचत नागरिकांशी सविस्तर संवाद साधला. थेट दाराशी जाऊन समस्या, अपेक्षा आणि परिसरातील प्राथमिक गरजांची माहिती घेण्याच्या या उपक्रमाला स्थानिकांनी मोठा प्रतिसाद दिला.
दरम्यान ,संविधान दिनाचे औचित्य साधत दिवसाची सुरुवात भारतीय संविधानातील मूलभूत मूल्यांची उजळणी करून करण्यात आली. नागरिकांच्या सहभागातून लोकशाही बळकट करण्याचा संदेश देतानाच, “धाराशिवच्या पुढील टप्प्यातील विकासात प्रत्येक मत महत्त्वाचे आहे”, असे मत व्यक्त झाले.
आकाश तावडे यांच्या संवाद मोहिमेत पाणीपुरवठा, रस्त्यांची स्थिती, स्वच्छता, प्रकाशव्यवस्था, सार्वजनिक जागांचा विकास यांसह मूलभूत पायाभूत सुविधांवर प्रामुख्याने चर्चा झाली. नागरिकांनी मांडलेल्या अडचणींची नोंद घेत प्रत्यक्ष उपाययोजनांची रूपरेषा तयार करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या संवादात मधुकरमामा तावडे, अस्मिताताई कांबळे, सतीश घोडेराव, लक्ष्मण माने, पंकज जाधव, नंदाताई पुनगुडे, मनीषाताई देशमुख, माधुरीताई गरड यांच्यासह प्रभागातील अनेक नागरिक उपस्थित होते.
अर्चनाताई पाटील यांच्या सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये विश्वास, उर्जाशक्ती आणि सकारात्मकतेचे वातावरण अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.
प्रभागात वाढता जनसंपर्क, नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद आणि मांडल्या जाणाऱ्या अपेक्षा यावरून आगामी निवडणुकीत विकासाभिमुख वातावरण निर्माण होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
























Total views : 4449