प्रभाग १४ (अ) मध्ये नेहा ताईंच्या डोअर टू डोअर जन संपर्क मोहिमेला उत्साहवर्धक प्रतिसाद .
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ (अ) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या “घड्याळ” चिन्हावर उमेदवारी करणाऱ्या सौ. नेहा संदीप बनसोडे यांनी डोअर टू डोअर प्रचार मोहिमेला वेग दिला असून, या उपक्रमाला नागरिकांचा चांगला उत्सुर्फत प्रतिसाद मिळत आहे.
नेहा ताईंनी गेल्या काही दिवसांत प्रभागातील विविध वसाहती, गल्ल्या आणि घरांमध्ये थेट भेट देत नागरिकांशी संवाद साधला. स्थानिक पातळीवरील समस्या आणि सुविधांबाबत नागरिकांनी मांडलेले मुद्दे त्यांनी शांतपणे ऐकून घेतले.
या मोहिमेत विशेषतःवरिष्ठ नागरिकांनी मांडलेल्या गरजा ,महिलांच्या सुरक्षेसंबंधी सूचना ,पाणीपुरवठा आणि स्वच्छतेसंबंधी तक्रारी ,अंतर्गत रस्त्यांबाबत मते या सर्व बाबींवर नेहा ताईंनी काळजीपूर्वक नोंद घेतल्याचे दिसून येते.
त्यांचे पती श्री. संदीप बनसोडे यांनी मागील काळात केलेल्या सामाजिक कार्याचा परिणाम म्हणून अनेक कुटुंबांनी त्यांचा आणि नेहा ताईंचा परिचय ओळखीने स्वीकारला. या डोअर टू डोअर मोहिमेमध्ये सर्वधर्मीय समाजघटकांचा सहभाग दिसून आला आहे.
प्रभागातील नागरिकांनी नेहा ताईंच्या शांत, संयमी आणि संवादकुशल भूमिकेचे स्वागत केले असून, त्यांच्या भेटीमुळे अनेक स्थानिक प्रश्नांना योग्य दृष्टी मिळत असल्याचा नागरिकांचा प्रतिसाद आहे.
प्रभागातील सर्वसाधारण वातावरण विकासाभिमुख विषयांकडे झुकलेले असल्याने नेहा ताईंच्या घराघरात पोहोचणाऱ्या या मोहिमेने परिसरात सकारात्मक चर्चा निर्माण केली आहे.

























Total views : 4449