धाराशिव नगरपरिषदेच्या निवडणूकीत भाजपचा प्रचार दमदार वेगात “केलंही आम्ही, करणारही आम्हीच!”
केंद्रात – भाजपा, राज्यात – भाजपा, आता आपल्या शहरातही – भाजपा!
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव: – धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला प्रचार मोर्चा आणखी तीव्र केला असून शहरभर “केंद्रात – भाजपा, राज्यात भाजपा, आता आपल्या शहरातही भाजपा!” हा संदेश दमदारपणे पोहोचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
प्रभागनिहाय सभा, घरदार संपर्क, नागरिकांशी मुक्त संवाद अशा विविध उपक्रमांमुळे भाजपचा प्रचार वेगात असून शहरातील वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. भाजपच्या स्थानिक नेतृत्वासह युवा मोर्चा, महिला आघाडी व बूथस्तरावरील कार्यकर्त्यांची मोठी फौज रस्त्यावर उतरली आहे.
“केलंही आम्ही, करणारही आम्हीच!” या घोषवाक्याच्या माध्यमातून मागील कार्यकाळातील विकासकामांची उजळणी तसेच पुढील नियोजन नागरिकांसमोर मांडले जात आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, शहराचा व्यापक विकास या मुद्द्यांवर नागरिकांची मते जाणून घेत त्यांना ठोस आश्वासन देण्यावर भर दिला जात आहे.
धाराशिवच्या सर्वांगीण विकासासाठी दरम्यान,भाजपच सक्षम पर्याय असल्याचा दावा स्थानिक नेतृत्वाकडून सातत्याने केला जात असून प्रचाराला मिळणारा प्रतिसाद पाहता लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.





















Total views : 4449