डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोहोळ येथील चैत्य स्मारक येथे रक्तदान शिबीर आयोजित .
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त मोहोळ येथील चैत्य स्मारक येथे मोहोळ नगरपरिषद लोकनियुक्त भाजपा नगराध्यक्ष उमेदवार सौ शितल सुशील क्षीरसागर यांनी जाऊन त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी स्मारक समितीच्या वतीने रक्तां शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास ही त्यांनी भेट दिली.
डॉ. आंबेडकरांनी आयुष्यभर समानता, न्याय आणि बंधुतेचा संदेश देत, शोषित आणि वंचितांना त्यांचे हक्क मिळवून दिले. त्यांनी निर्माण केलेल्या संविधानातून भारताला लोकशाहीची नवी दिशा मिळाली. त्यांचे हे अतुलनीय कार्य आणि थोर विचार आपल्याला सदैव प्रेरणा देत राहतील. या महामानवाला कोटी-कोटी प्रणाम! असे उद्गार यावेळी सौ. शितल क्षीरसागर यांनी काढले.
यावेळी मोहोळ नगरपरिषद भाजपा निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर, प्रभाग ५ भाजपा उमेदवार विक्रम फडतरे, सौ सरिता संतोष सुरवसे , यशोदा कांबळे, हेमंत गरड, माजी नगरसेविका मनीषा ताई फडतरे, सागर लेंगरे, अमर कसबेकर, नवनाथ चव्हाण, बापू हरमुडे , चंदनशिवे काका, सखुबाई क्षीरसागर, अक्षय ब्लड बँक चे सर्व सहकारी , रक्तदान करण्यासाठी आलेले रक्तदाते, रक्तदान शिबिर आयोजक सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक व महिला उपस्थित होत्या.






















Total views : 4449