“अर्चनाताई राणा-जगजीतसिंह पाटील मैदानात उतरनार म्हणताच धाराशिवमध्ये विरोधकांत एकच खळबळ;
➡️ ‘अर्चनाताई नाम ही काफी है’ म्हणत विरोधकांची झोप उडाली!”
धाराशिव | सय्यद कलीम मुसा
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसांत पेटणार असून उमेदवारीच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापले आहे. विशेष म्हणजे अर्चनाताई राणा-जगजीतसिंह पाटील जिल्हा परिषद निवडणूक लढवणार असल्याची बातमी प्रसिद्ध होताच विरोधकांच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे.
शहरात, तालुक्यात आणि ग्रामीण भागात सध्या एकच चर्चा “बस, अर्चनाताई नाम ही काफी है!”
नागरिक सांगत आहेत की विरोधकांकडे ना विकासाचा मुद्दा, ना कामगिरी, ना नीट अजेंडा,“विरोधकांचा उद्योग म्हणजे फक्त टीका!”अशी शब्दशः चर्चा बाजारपेठेतून ते गावकुसापर्यंत ऐकायला मिळत आहे.
अर्चनाताईंचा ‘अनुभव’ विरोधकांना पडला जड!
अर्चनाताईंनी यापूर्वी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पद भूषवलेले असून प्रशासन, विकासकामे, निधी आणणे, योजना राबवणे यात त्यांचा हातखंडा आहे.
ग्रामीण भागातील अनेक सोडवलेल्या समस्या, राबवलेल्या योजना आणि महिलांसाठी उभ्या केलेल्या संधीमुळे त्यांची “विकासदूत” अशी ओळख निर्माण झाली आहे.
नागरिकांमध्येही चर्चा रंगली आहे
“अनुभव तगडा, काम दमदार… विकास कसा खेचून आणायचा हे अर्चनाताईंना चांगलं ठाऊक!”
जिल्हा परिषदेत पुन्हा अर्चनाताई? स्थानिकांमध्ये उमेदवारी जिंकलीच!
सर्वसामान्य मतदारांमध्ये असा सूर आहे की,“अर्चनाताई निवडणूक लढणारच… आणि निवडूनही येणारच!”
त्यांची मैदानात उतरायची केवळ अधिकृत घोषणा बाकी असून, त्या क्षणापासून विरोधकांची धावपळ अधिक वाढेल, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
धाराशिवमध्ये सध्या वातावरण एकाच घोषणेने दुमदुमत आहे —
“या वेळेस जिल्हा परिषदेत अर्चनाताईंचीच ‘क्लीन स्वीप!’”
कोट : –
अर्चनाताईंच्या नावानेच विरोधक घाबरले, तर त्यांच्या कामगिरीने नागरिक निवडणूक जिंकून देणार…
धाराशिवमध्ये अर्चनाताईंची एन्ट्री म्हणजे राजकीय चित्र पालटण्याची घंटा!





















Total views : 4449