उमरा जि.प. शाळेत महापरिनिर्वाण दिन भावपूर्ण वातावरणात साजरा
येरमाळा प्रतिनिधी (सुधीर लोमटे) —
कळंब तालुक्यातील उमरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम भावपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक करताना आरती कवडे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्याची माहिती दिली. डॉ. आंबेडकर यांनी देशासाठी लिहीलेले संविधान, विद्यार्थ्यांसमोर ठेवलेला आदर्श, समता, स्वातंत्र्य व बंधुता या मूल्यांचे महत्त्व आपल्या भाषणातून विशद केले. तसेच विद्यार्थ्यांनी भाषणे सादर करून मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास गावातील श्रीराम ओव्हाळ, अशोक पवार,शाळेचे शिक्षकवृंद, कर्मचारी, ग्रामस्थ, पालक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका आरती कवडे यांनी केले तर आभार शिक्षक रणजीत चौधरी सर यांनी मानले.





















Total views : 4449