जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खामसवाडीत भाजपची निवडणुक रणनीती बैठक .
माजी जि. प. उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या दौऱ्याला वाढता प्रतिसाद; संघटन अधिक बळकट .
कळंब ( सय्यद कलीम मुसा ):
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे भाजपची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खामसवाडी जिल्हा परिषद गटासह पंचायत समितीच्या दोन्ही गणांतील निवडणूकपूर्व तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई पाटील सध्या सर्व मतदारसंघ पिंजून काढत असून, तळागाळातील कार्यकर्ते व मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. त्यांच्या या व्यापक दौऱ्याला नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत असून, त्याचा सकारात्मक परिणाम संघटनात्मक बळकटीकरणावर होत असल्याची चर्चा बैठकीत झाली.
यावेळी गट व गणनिहाय राजकीय परिस्थिती, बूथ व्यवस्थापन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या रणनीतीवर सखोल चर्चा झाली. प्रमुख पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील वास्तव मांडत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्या सूचनांच्या आधारे आगामी निवडणुकीसाठी सूक्ष्म नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
राज्यातील भाजप महायुती सरकार तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात विविध विकास प्रकल्प वेगाने मार्गी लागत आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक जनकल्याणकारी योजनांबाबत सरकार सकारात्मक असून, या योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. यासाठी कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क वाढवून लोकांशी थेट संवाद साधावा, असे आवाहन करण्यात आले.
भाजपचे खंबीर नेतृत्व आणि लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकासाभिमुख धोरणांमुळे जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांत भाजपला भरघोस यश मिळाल्याचा उल्लेख करण्यात आला. हेच यश आगामी जिल्हा परिषद निवडणुकांतही कायम ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने, नियोजनबद्ध आणि जोमाने कामाला लागण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या बैठकीस खामसवाडी जिल्हा परिषद गटांतर्गत येणाऱ्या गावांतील प्रमुख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, बूथ प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Total views : 4449