पालिका जिंकल्यानंतर आता जिल्हा परिषदही ताब्यात घेणार – अर्चनाताई पाटील
नगरपालिका निवडणुकीत मिळालेल्या घवघवीत यशानंतर आता आगामी जिल्हा परिषद निवडणूकही लोकांच्या विश्वासावर जिंकून जिल्हा परिषद ताब्यात घेणार, असा ठाम निर्धार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, नगरपालिका निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल हा विकासाभिमुख आणि लोकाभिमुख कामांची पावती आहे. या विश्वासाला अधिक बळ देत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला व युवकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील.
गावागावात थेट संपर्क साधत सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्यावर ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. संघटित शक्ती, सक्षम नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची मेहनत याच्या जोरावर जिल्हा परिषद निवडणुकीत निश्चित यश मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















Total views : 4449