नरसिंह भैरवनाथ शुगर मिल्स येथे ‘विजयी संकल्प मेळावा’ची जोरदार तयारी सुरू
इंदापूर | सय्यद कलीम मुसा —
नरसिंह भैरवनाथ शुगर मिल्स परिसरात होणाऱ्या भव्य विजयी संकल्प मेळावाच्या पूर्वतयारीची पाहणी आज करण्यात आली. या पाहणीदरम्यान आयोजन, सुरक्षा, बैठक व्यवस्था, वाहनतळ, मंच उभारणी तसेच कार्यकर्त्यांच्या सोयी-सुविधांबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी केशव उर्फ विक्रम सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, शिवसेना तालुका प्रमुख सत्यवान गपाट, युवासेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, तालुका संघटक शिवहार स्वामी तसेच उपतालुका प्रमुख विकास तळेकर उपस्थित होते.
नेत्यांनी विविध समित्यांशी चर्चा करून नियोजन अधिक प्रभावी करण्याच्या सूचना दिल्या. “हा मेळावा केवळ विजयाचा उत्सव नसून, आगामी काळातील राजकीय दिशा ठरवणारा ठरेल,” असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व स्तरावर समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.
दरम्यान, परिसरात तयारीचा वेग वाढला असून, मेळाव्यासाठी भव्य स्वरूपात सजावट व सुविधा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.





















Total views : 4449