सेवाभावी वृत्ती, लोकाभिमुख कार्य आणि सामाजिक जाणिवेचा आदर्श
नगरसेवक आनंद मालक जगताप यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा
तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर नगर परिषदेचे नगरसेवक आनंद मालक जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सेवाभावी व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस म्हणजे केवळ औपचारिक कार्यक्रम नव्हे, तर समाजासाठी काहीतरी देण्याचा दिवस असावा, या सामाजिक भावनेतून हा वाढदिवस अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला.
या निमित्ताने उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. तसेच श्री स्वामी समर्थ मुलींचे वसतिगृह येथे शैक्षणिक साहित्य व चादरींचे वितरण करण्यात आले.
श्री संत तुकाराम महाराज मुलांचे वसतिगृह येथे लहान अनाथ मुलांसाठी अन्नदान करण्यात आले.
याशिवाय जय तुळजाभवानी माता प्राथमिक आश्रम शाळा, तुळजापूर येथे अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला.
शांतीसागर प्राथमिक विद्यामंदिर, गोपाळ नगर, तुळजापूर येथील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करून शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात आले. या सर्व उपक्रमांमधून सामाजिक बांधिलकी आणि लोकाभिमुखतेचा आदर्श निर्माण करण्यात आला.
या सेवाभावी उपक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी विशाल ( राणा ) भांजी व मित्रपरिवार यांनी विशेष परिश्रम घेतले.
नगरसेवक आनंद मालक जगताप यांच्या या उपक्रमांमुळे वाढदिवस साजरा करण्याची एक सकारात्मक आणि प्रेरणादायी दिशा समाजासमोर ठेवली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





















Total views : 4449