भगवा फडकणारच..! धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत मोठ्या उलथा पालथीचे संकेत..!!
➡️सावंत समर्थकांच्या आक्रमक भूमिकेने राजकीय हालचालींना वेग .
धाराशिव :
काही दिवसांपूर्वी घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर धाराशिव जिल्ह्यातील राजकारण अधिक गतिमान झाले आहे. माजी मंत्री व आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यांनंतर जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले असून, जिल्हा परिषदवर भगवा फडकणारच असा ठाम विश्वास सावंत समर्थक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मेळाव्यांमध्ये कार्यकर्त्यांचा उत्साह, आत्मविश्वास आणि आक्रमक सूर स्पष्टपणे दिसून आला.ही लढाई केवळ आकड्यांची नाही, तर नेतृत्वावर असलेल्या विश्वासाची आहे. आमचे नेते जे बोलतात ते करून दाखवतात आणि जनतेची साथ आमच्यासोबत आहे, असे मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.
कार्यकर्त्यांनी पुढे सांगितले की,
काही दिवसांपूर्वी जे घडले, त्यानंतर चित्र अधिक स्पष्ट होत आहे. संघटन मजबूत आहे, गावोगावी संपर्क वाढतो आहे आणि प्रत्येक गटात उत्साह दिसतो आहे. त्यामुळे यावेळी जिल्हा परिषदवर भगवा फडकण्याबाबत कोणतीही शंका नाही.
मेळाव्यांनंतर ग्रामीण भागात हालचालींना वेग आला असून, बैठका, संवाद आणि नियोजन सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे इतर राजकीय गटांमध्येही हालचाली वाढल्याचे चित्र दिसत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
शेवटी कार्यकर्त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की,नेतृत्वाची हाक, कार्यकर्त्यांची ताकद आणि जनतेचा विश्वास – या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर निकाल काय असेल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही.




















Total views : 4448