मेहनत, जिद्द आणि यश – श्रुती शिंदेने गाठले नवोदयचे स्वप्न!
सरस्वती विद्यालय, शिंगोली येथील विद्यार्थिनी कु. श्रुती युवराज शिंदे हिची नवोदय विद्यालयात निवड झाल्याने संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने मिळवलेले हे यश अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे.
या यशामागे शाळेच्या मुख्याध्यापिका मा. पल्लवी गोरे यांचे मोलाचे मार्गदर्शन, तसेच संस्थेचे अध्यक्ष मा. आबासाहेब रणखांब यांचे प्रेरणादायी नेतृत्व लाभले आहे. त्याच बरोबर विस्तार अधिकारी मा श्री प्रकाश पारवे साहेब,केंद्रप्रमुख सुकेशनी वाघमारे मॅडम यांनी कौतुक केले सौ. सारिका गाढवे व सौ. अश्विनी लबडे , मनिषा शिनगारे यांचे मार्गदर्शन लाभले
श्रुतीने सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी व पालक वर्गाकडून, शाळा व्यवस्थापन समिती अभिनंदनाचा वर्षाव होत असून तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 9132