• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, May 30, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी

Sayyad Musa by Sayyad Musa
May 28, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
67
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी

शेतकरी, विद्यार्थी व सर्वसामान्यांसाठी ठरणार जीवनदायी मार्ग

भूम / धाराशिव (वार्ताहर) – पार्डी फाट्यापासून भूम, वालवड, आनाळा, गोंदा, हिंगणगाव, देऊळगाव, गोसाईवाडी, आलेश्वर, करंजे, करमाळा, राशिन मार्गे भिगवणपर्यंत प्रस्तावित चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे. हा महामार्ग शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी तसेच रुग्णांसाठी भविष्यात वरदान ठरणार असल्याची भावना परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

सदर महामार्गाला “भाई उद्धवराव पाटील महामार्ग” असे नाव देण्यात यावे, अशीही मागणी पुढे येत आहे. या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पासाठी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर, भाजप नेते सुजित ठाकूर, माजी आमदार राहुल मोटे, विद्यमान आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत आदी मान्यवरांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देऊन पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र अद्याप या प्रकल्पास अपेक्षित गती मिळालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. हा महामार्ग धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार असून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या दोन विभागांमधील संपर्क अधिक वेगवान होणार आहे.

या महामार्गामुळे कृषी माल वाहतूक, आरोग्य सेवा, शिक्षण, रोजगार, उद्योग व्यवसाय आणि दळणवळण यामध्ये मोठी सुधारणा होणार असल्याचे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तसेच रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवेसाठी मोठा फायदा होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे “कामाचा सातत्याने पाठपुरावा झाला पाहिजे, मी तातडीने निधी मंजूर करतो” हे ब्रीदवाक्य प्रसिद्ध असून, धाराशिव व परिसरातील सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्रितपणे या महामार्गासाठी अधिक प्रभावी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

जनतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला हा चार लेन महामार्ग लवकरात लवकर मंजूर होऊन प्रत्यक्षात यावा, अशी मागणी आता सर्व स्तरांतून होत आहे.

Previous Post

गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त

Next Post

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व संघटन बांधणीवर सकारात्मक चर्चा

May 30, 2026

पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक

May 29, 2026

युवाशक्तीचा आवाज ठरणार जनतेचा नवा विश्वास

May 29, 2026

पार्डी-भिगवण चार लेन महामार्गाला तातडीने मंजुरी द्यावी

May 28, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007985
Total views : 12798

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In