• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, April 20, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

Sayyad Musa by Sayyad Musa
April 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त 22 एप्रिल रोजी भव्यदिव्य मिरवणूक 

विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन; मार्गदर्शक धनंजय शिंगाडे यांची माहिती

धाराशिव –

बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने  धाराशिव शहरात 22 एप्रिल रोजी सायंकाळी भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.  तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहून मिरवणुकीचे उद्घाटन करणार असल्याची माहिती बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जयंती समितीचे मार्गदर्शक धनंजय (नाना) शिंगाडे यांनी दिली.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, बलराज रणदिवे,, मसूद शेख, माजी नगरसेवक खालील सय्यद, नगरसेवक अजहर मुजावर, आयाज शेख, सतीश कदम, रोहीत पडवळ, लक्ष्मण माने, पांडू भोसले,  अभिजित सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

शिंगाडे यांनी सांगितले की, बहुजन योद्धा सामाजिक संघटनेमार्फत गेली 32 वर्षापासून धाराशिव येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. महापुरुषांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य संघटना सातत्याने करत आहे .मिरवणुकीत महिला, पुरूष, युवक मोठ्या संख्येने सहभागी होतात. विशेष म्हणजे जयंती उत्सव समितीमध्ये सर्व जाती-धर्मातील व्यक्तींचा समावेश असून दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विशेषतः पारंपारिक वाद्यांच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते. तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, रुग्णांना फळे वाटप, वृक्ष लागवड यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील विविध राज्यातील पारंपारिक वाद्य समूहांना आमंत्रित करण्यात आल्यामुळे ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.  सध्या जगात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

22 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता जिजाऊ चौक येथून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी 

धाराशिव शहरातील क्रांती चौक भीमनगर येथून भव्यदिव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.  शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. या भव्यदिव्य मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील  आंबेडकरी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही शिंगाडे यांनी केले.

Previous Post

बारामतीच्या रेहाना महेबूब शेख यांना मातोश्री आश्रमात आश्रयधाराशिव : बारामती येथील रहिवासी रेहाना महेबूब शेख यांना

Sayyad Musa

Sayyad Musa

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहणार

April 20, 2026

बारामतीच्या रेहाना महेबूब शेख यांना मातोश्री आश्रमात आश्रयधाराशिव : बारामती येथील रहिवासी रेहाना महेबूब शेख यांना

April 20, 2026

आळणी येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात; भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

April 20, 2026

जनतेच्या दारात सत्ता!” पाडोळीतील जनता दरबारात प्रश्नांवर झटपट फैसला

April 19, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005577
Total views : 9401

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In