• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, June 13, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

भाजपची राजनीती भेदभावावर आधारित असल्यामुळे ओबीसींची फरपट – भिंगे

Sayyad Musa by Sayyad Musa
April 26, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
16
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

भाजपची राजनीती भेदभावावर आधारित असल्यामुळे ओबीसींची फरपट – भिंगे

ओबीसी संवाद दौऱ्यास प्रतिसाद

धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – भारतीय जनता पार्टीने ओबीसी घटकांची फरफट चालविली आहे. निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळी ४६ महामंडळे काढली. परंतू, त्यासाठी अध्यक्षांचा पत्ता नाही, ऑफिसचा पत्ता नाही आणि निधीचा देखील पत्ता नाही. अहिल्यादेवी होळकर यांना एका बाजूला धर्मरक्षणी म्हणायचं आणि अहिल्यादेवींनी १७७१ मध्ये बांधलेला मनकर्णिका घाट बुलडोजर लावून पाडायचा असे धोरण भाजपचे आहे. धनगर आरक्षण मागणीसाठी आंदोलन सुरू असताना आंदोलन स्थळी भेट देत भंडारा लावून तुम्ही आम्हाला मतदान करा सत्ता आल्यास पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊन टाकू असे आश्वासन तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर, मी पुन्हा येईन असे म्हणत तीन वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांनी धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे प्रमाणपत्र आजपर्यंत दिलेले नाही. मुळात भाजपची राजनीती भेदभावावर आधारित असल्यामुळे त्यांनी ओबीसींची फरपट लावली असल्याचा घनाघाती आरोप काँग्रेसचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांनी दि.२५ एप्रिल रोजी केला.
धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, प्रदेश सचिव पांडुरंग कुंभार, मलंग शेख, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सय्यद खलील, तालुकाध्यक्ष विनोद वीर, धाराशिव शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, डीसीसी बँकेचे संचालक मेहबूब पटेल, उमेश राजेनिंबाळकर, ॲड जावेद काझी, जिल्हा सचिव सरफराज काझी, अशोक बनसोडे, ओबीसी शहराध्यक्ष हरिदास शिंदे, युवक काँग्रेसचे संकेत पडवळ, ॲड. राजुदास आडे, सुनील बडूरकर, मिलिंद गोवर्धन, तनुजा हेड्डा, adv. उस्मान मोरवे, अंकुश पेठे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष भिंगे म्हणाले की, ओबीसींशी संवाद साधण्यासाठी काँग्रेसचा संवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्याची सुरुवात समता भूमीपासून भिडे वाड्यात वंदन करून केली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर करून आज धाराशिव जिल्ह्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी समाज हा कष्टकरी असून कष्टकरी हे कधीच विषमतावादी नसतात. मात्र, संघ प्रणित भाजप ओबीसींना विषमतावादी करण्याचा क्रूर डाव करीत आहे. तसेच
भाजप हा कर्मठ हिंदू धर्मावर गाणं हे सातत्याने गायला लागला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आम्ही थेट ओबीसींच्या वस्त्यांवर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहोत. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ओबीसींची जनगणना करण्याची मागणी केली असून त्यांच्या टक्केवारीच्या प्रमाणात त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ओबीसीमध्ये राजीव गांधी यांचे आकर्षण पाहायला मिळत आहे. तर आमच्या संवाद यात्रेत देखील ओबीसींचा प्रतिसाद मिळत असल्यामुळे आम्हाला आत्मविश्वास येत असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले मात्र निवडणुकीमध्ये श्रीमंत मराठ्यांनी त्याचा फायदा घेतला असे सांगत ते म्हणाले की, भाजप सत्तेत आल्यापासून मराठा-धनगर व मराठा-ओबीसी असे भांडणे लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात भाजप व्हायरस घुसला असून तो काढल्याशिवाय महाराष्ट्र शुद्ध होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे शिवाजी कोण होता ? या पुस्तकावरून आमदार गायकवाड यांनी जी वैचारिक दिवाळखोरी दाखवली, ती जातीच्या उदात्तीकरणातून दाखवली असल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वी कधीही वैचारिक अध्यपतन झाले नव्हते हे अध्यपतन रोखण्यासाठी सरकार विशेषतः गृहमंत्री काय झोपलेत का ? तसेच फडणवीस यांनी एक तरी विकासाची योजना आणली का ? असे प्रश्न त्यांनी विचारले. मुळात भाजपचा डीएनएच विषमतावादी असून

भाजपच्या काळात वैचारिक दृष्ट्या अधपतन झालेले आहे, यापूर्वी कधीही झाले नव्हते. त्यातच सत्तेवर निर्बुद्ध व नालायक लोक बसले असल्यामुळे जनतेनेच जोडे घेऊन त्यांच्या पाठीमागे लागले पाहिजे असे आवाहन भिंगे यांनी केले.

कृपया वरील बातमीस प्रसिद्धी मिळावी, ही विनंती..🙏

Previous Post

महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून पासून बेमुदत संप

Next Post

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’; तानाजीराव सावंतांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विजय मंत्रभूम | प्रतिनिधी

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक'; तानाजीराव सावंतांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विजय मंत्रभूम | प्रतिनिधी

तेरखेडा येथे दोन सभामंडपांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम

June 13, 2026

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची पारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला अचानक भेट; आरोग्य सेवांच्या गुणवत्तेवर समाधानपारगाव | प्रतिनिधी

June 12, 2026

बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती

June 12, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008790
Total views : 13906

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In