स्वखर्चातून मंदिर परिसर सुशोभित; आमदार तानाजीराव सावंत यांचा आदर्श उपक्रम
परंडा (प्रतिनिधी):
मौजे सिरसाव (ता. परंडा) येथील विठ्ठल बिरुदेव मंदिर परिसरात आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या स्वखर्चातून फेवर ब्लॉक बसविण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे मंदिर परिसर सुशोभित झाला असून ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या कामासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता (आण्णा) साळुंखे, रामचंद्र घोगरे सर तसेच शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
मंदिर परिसरात पूर्वी असलेल्या असुविधा दूर करून आता स्वच्छ व सुस्थितीत जागा उपलब्ध झाली आहे. आमदार सावंत यांनी स्वखर्चातून केलेल्या या कामामुळे त्यांच्या विकासाभिमुख कार्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती आल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
फेवर ब्लॉक बसविण्याच्या या कामाबद्दल सिरसाव ग्रामस्थांनी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे आभार मानून अभिनंदन केले आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12314