• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल

Sayyad Musa by Sayyad Musa
May 3, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
12
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मध्य रेल्वेचा सर्वात मोठा ‘सिंगल स्पॅन’ पूल

शिंगोलीत उभा राहणार १०६ मीटरचा भव्य पूल!

धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सुसाट : राष्ट्रीय महामार्गावरून होणार रेल्वेचे क्रॉसिंग

मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

जिल्ह्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. या प्रकल्पातील अत्यंत कठीण आणि महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिंगोली जवळील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांबीचा १०६ मीटर लांबीचा ‘सिंगल स्पॅन’ पूल ठरणार असल्याची माहिती मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या ८४.४४ किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईनचे कामाच्या प्रगतीचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिंगोळी याठिकाणी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला. सध्या हे काम वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा धाराशिव ते तुळजापूर हा पहिला टप्पा मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे. तर, सोलापूर ते तुळजापूर हा दुसरा टप्पा त्यानंतर पूर्ण केला जाणार आहे. यामुळे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रकल्पांतर्गत शिंगोली येथे सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गाला क्रॉस करणारा भव्य पूल बांधण्यात येत आहे. तांत्रिकदृष्ट्या हा पूल अतिशय भव्य असून, दोन खांबांमधील अंतर तब्बल १०६ मीटर इतके असणार आहे. एवढ्या मोठ्या अंतराचा ‘सिंगल स्पॅन’ असलेला हा मध्य रेल्वेचा पहिलाच पूल असल्याचे सांगितले जात आहे. पुढील ८-९ महिन्यांत हे काम पूर्ण होणार असून सध्या या ठिकाणी ड्रिलिंग आणि पायाभरणीचे काम वेगात सुरू आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यासाठी साधारणपणे ३ महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून, त्यानंतर लॉन्चिंग आणि इतर प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ८ ते ९ महिने लागणार आहेत. यासाठी आधुनिक मशिनरी आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. कामादरम्यान महामार्गावरील वाहतुकीचे नियोजन करून पुलाच्या उभारणीचे टप्पे पूर्ण केले जाणार आहेत. या प्रकल्पाच्या प्रगतीमुळे धाराशिवकरांच्या रेल्वे स्वप्नाला आता नवी गती मिळाली असून, स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

धाराशिव रेल्वे स्थानकाचेही काम प्रगतीपथावर

धाराशिव रेल्वे स्थानकापासून या रेल्वे ट्रॅकचे काम शिंगोलीच्या दिशेने वेगाने सरकत आहे. हा नवीन मार्ग कार्यान्वित झाल्यानंतर तुळजापूर हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडले जाणार आहे, ज्याचा फायदा लाखो भाविकांना आणि स्थानिक नागरिकांनाही होणार आहे. हा १०६ मीटरचा पूल या मार्गावरील अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना असेल. सध्या ड्रिलिंग सुरू असून पुढील काही महिन्यांत पुलाचा मुख्य सांगाडा उभा राहिलेला सर्वांना पाहायला मिळणार आहे.

Previous Post

अनुसूचित जाती उप वर्गीकरण संदर्भात ५ मे रोजी बैठकीचे आयोजन – शिंगाडे

Next Post

स्वखर्चातून मंदिर परिसर सुशोभित; आमदार तानाजीराव सावंत यांचा आदर्श उपक्रम

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

स्वखर्चातून मंदिर परिसर सुशोभित; आमदार तानाजीराव सावंत यांचा आदर्श उपक्रम

कव्हरेज क्षेत्राबाहेर’चा बहाणा; शालिमार कॉलनीत वीजप्रश्न चिघळला, निष्काळजी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007619
Total views : 12314

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In