संघर्ष, स्वाभिमान आणि तत्त्वांशी निष्ठा; आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे नेतृत्व पुन्हा चर्चेत
भूम : राजकारणात सत्तेची समीकरणे बदलत राहतात, अनेक नेते परिस्थितीनुसार भूमिका बदलतात; मात्र संकटांच्या काळातही आपल्या तत्त्वांशी ठाम राहणारे नेतृत्व म्हणून आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्याकडे पाहिले जाते. भूम-परांडा-वाशी मतदारसंघात शिवसेना पक्षाची ताकद उभी करताना त्यांनी अनेक राजकीय आव्हानांचा सामना केला, पण कुठल्याही परिस्थितीत मागे हटण्याची भूमिका घेतली नाही.
नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना पक्षाने स्वतंत्रपणे मैदानात उतरून उल्लेखनीय यश संपादन केले. या संपूर्ण राजकीय प्रवासात आमदार डॉ. सावंत यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेत संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला. पक्षाच्या वाढीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत आणि सर्वसामान्यांशी कायम ठेवलेला संवाद यामुळे आजही मतदारसंघात त्यांच्याबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला जातो.
सावंत साहेबांचे नाव घेतले की अनेकांच्या डोळ्यासमोर एक लढवय्या आणि जमिनीशी नाळ जोडलेला नेता उभा राहतो. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने भूमिका घेणे, अडचणीत असलेल्या नागरिकांसाठी धावून जाणे आणि संघर्षाला सामोरे जात ठामपणे उभे राहणे ही त्यांची कार्यशैली राहिली आहे.
राजकीय आयुष्यात अनेकदा टीका, विरोध आणि बदनामीचे प्रसंग आले, मात्र प्रत्येक वेळी अधिक ताकदीने पुढे जाण्याची भूमिका त्यांनी घेतली. “संघर्ष टाळायचा नाही, तर त्यातून मार्ग काढायचा,” हीच त्यांची ओळख बनली असल्याची भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.
शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला. आंदोलनं, बैठका आणि जनसंपर्काच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघात स्वतःची वेगळी कार्यपद्धती निर्माण केली. अनेक कार्यकर्त्यांच्या मते, “साहेबांसाठी राजकारण हे केवळ सत्तेचं माध्यम नाही, तर जनतेशी असलेली बांधिलकी आहे.”
आजच्या बदलत्या राजकीय वातावरणात तत्त्वांशी तडजोड न करता काम करणारे नेतृत्व म्हणून आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांचे नाव घेतले जाते. परिस्थिती बदलली, राजकीय समीकरणे बदलली, तरी त्यांच्या कार्यपद्धतीतील आक्रमकता आणि जनतेसाठी लढण्याची भूमिका कायम असल्याचे चित्र मतदारसंघात दिसून येत आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12318