तेरणा अध्ययन केंद्राची यशस्वी परंपरा कायम; १४ विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड
प्रतिनिधी. सचिन कदम:-
धाराशिव : स्व. डॉ. सौ. चंद्रकलादेवी पद्मसिंह पाटील ग्रंथालय व तेरणा स्पर्धा परीक्षा अध्ययन केंद्राने स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले असून सन २०२६ मध्ये एकूण १४ विद्यार्थी विविध शासकीय पदांवर यशस्वी झाले आहेत. या यशामुळे धाराशिव जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.
यामध्ये अतुल करवर यांची महसूल सहाय्यक, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई येथे निवड झाली असून अविनाश वाघमारे, अभिजित ओव्हाळ आणि रामलिंग निलाखे यांची धाराशिव पोलीस दलात पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली आहे. तसेच कृष्णा कुंभार यांची बीड पोलीस दलात तर शंकर पालखे यांची मीरा-भाईंदर पोलीस विभागात पोलीस कॉन्स्टेबल पदावर निवड झाली आहे.
आदरणीय डॉ. साहेबांच्या आशीर्वादातून तसेच आदरणीय राणादादा यांच्या संकल्पनेतून आणि आमदार मल्हारदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ३ मार्च २०१४ पासून हा उपक्रम सुरू करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून या अध्ययन केंद्राच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवत शासकीय सेवेत स्थान मिळवले आहे.
विशेषतः ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी हे अध्ययन केंद्र आशेचा किरण ठरत असून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन, अभ्यासाचे वातावरण आणि प्रेरणा येथे मिळत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार आदरणीय राणादादा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थ्यांच्या यशामुळे अध्ययन केंद्राच्या कार्याचा गौरव होत असून जिल्ह्यातील अनेक युवकांसाठी हे केंद्र प्रेरणास्थान बनले आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 12317