• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेकरिता अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी.

Sayyad Musa by Sayyad Musa
May 20, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषदेकरिता अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांची पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीची मागणी.

(धाराशिव–लातूर–बीड जिल्ह्यात सहकार व उद्योगाचे मजबूत वलय)

धाराशिव–लातूर–बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांनी पक्षश्रेष्ठींकडे अधिकृतपणे उमेदवारीची मागणी केली आहे. तसेच, त्यांनी मा. आ. रविंद्र चव्हाण (प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य), मा.देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) व मा. ना. चंद्रशेखर बावनकुळे (मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्याकडेही उमेदवारी मिळावी यासाठी मागणी केल्याची माहिती समोर आली आहे.

धाराशिव प्रदेश कार्यकारिणी सदस्य तसेच रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक म्हणून अ‍ॅड. गुंड पाटील यांची ओळख आहे. पाडोळी (आ.) या गावातून उभा राहिलेला गुंड परिवार गेल्या चार दशकांपासून शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात घडलेले अ‍ॅड. गुंड यांनी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांसारख्या संघटनांमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांनी 1977 साली पुणे येथे प्रथम वर्ग, तर 1984 साली नाशिक येथील केटीएचएम महाविद्यालयात प्रथम व द्वितीय वर्षे स्वयंसेवक प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ते भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत.

गुंड कुटुंबाची राजकीय परंपरा देखील भक्कम आहे. त्यांच्या ज्येष्ठ बंधूंनी सरपंच, जिल्हा परिषद सदस्य व धाराशिव जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदांवर काम केले असून, पत्नी सुलभा व्यंकट गुंड पाटील यांनी जिल्हा परिषद सदस्य म्हणून यशस्वी कारकीर्द केली आहे. कुटुंबातील इतर सदस्यांनीही विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काम करत विकास प्रक्रियेला गती दिली आहे. स्वतः अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील यांनी अनेक वर्षे सरपंच तसेच गृहरक्षक दलाच्या जिल्हा समादेशक पदावर कार्य करत प्रशासनिक अनुभव मिळवला आहे.

औद्योगिक क्षेत्रात त्यांनी उभारलेला रूपामाता उद्योग समूह हा परिसरातील शेतकरी, कामगार व बेरोजगारांसाठी आधारवड ठरत आहे. सहकार, बँकिंग, शिक्षण, दुग्ध व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात त्यांनी उभारलेले विस्तृत जाळे धाराशिव, लातूर व बीड जिल्ह्यांत पसरले असून, यामुळे ऊस व दुग्ध प्रश्न सोडविण्यासोबतच युवकांच्या रोजगार निर्मितीस चालना मिळाली आहे.


📌 विशेष

विशेष म्हणजे, तुळजापूर विधानसभा मतदारसंघात २०१९ तसेच २०२४ च्या निवडणुकांमध्ये अ‍ॅड. व्यंकटराव गुंड पाटील हे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले होते. मात्र, त्या काळातील काही राजकीय समीकरणांमुळे पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. त्या वेळी पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या कार्याची दखल घेत भविष्यात निश्चित संधी देण्याचा शब्द दिला होता. त्यामुळेच आता विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेली उमेदवारीची मागणी अधिक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Previous Post

पंचायत समिती आपल्या दारी” उपक्रमाची खासगावातून दमदार सुरुवात

Next Post

अवघ्या तीन दिवसांत ३७६ बूथप्रमुख नियुक्ती; बाळासाहेब मांगले यांचा धाराशिवात गौरव

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

अवघ्या तीन दिवसांत ३७६ बूथप्रमुख नियुक्ती; बाळासाहेब मांगले यांचा धाराशिवात गौरव

वाशी पंचायत समितीच्या नवनियुक्त सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007622
Total views : 12317

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In