महिलांच्या सक्षमीकरणासाठी रोजगार व संघटन बांधणीवर सकारात्मक चर्चा
शिवसेना महिला आघाडीच्या प्रश्नांवर आमदार तानाजीराव सावंत यांच्याशी सारिकाताई अंधारे यांची विशेष भेट
पुणे, प्रतिनिधी : बालाजीनगर संपर्क कार्यालय, पुणे येथे शिवसेना महिला आघाडी परंडा तालुकाप्रमुख सौ. सारिकाताई अंधारे यांनी भुम-परंडा-वाशी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा माजी आरोग्यमंत्री यांची सदिच्छा भेट घेत विविध सामाजिक, संघटनात्मक व विकासकामांबाबत सविस्तर चर्चा केली.
या भेटीदरम्यान शिवसेना महिला आघाडीचे संघटन अधिक बळकट करण्यासाठी “गाव तिथे शाखा” या संकल्पनेवर भर देण्यात आला. तसेच मतदारसंघातील महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, स्वयंरोजगाराला चालना देणे आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.
महिलांच्या प्रश्नांप्रती संवेदनशील भूमिका घेत आमदार सावंत यांनी विविध विषयांचा आढावा घेत मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांप्रती त्यांचा असलेला जिव्हाळा, आपुलकी, आदर आणि समस्यांकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन यामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी सौ. सारिकाताई अंधारे यांनी महिलांच्या विविध मागण्या व अपेक्षा आमदार सावंत यांच्यासमोर मांडल्या. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विषयांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
राजकीय नेतृत्वासोबतच सामाजिक बांधिलकी जपत कार्यकर्त्यांशी कायम संवाद ठेवणारे नेतृत्व म्हणून आमदार तानाजीराव सावंत यांच्याविषयी कार्यकर्त्यांमध्ये विशेष आदरभाव असल्याचे या भेटीतून पुन्हा अधोरेखित झाले.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 12801