महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या धाराशिव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्रीशेखर विजयानंद साखरे यांची नियुक्ती
धाराशिव | प्रतिनिधी
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या धाराशिव ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी श्रीशेखर विजयानंद साखरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक तथा अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाळे यांनी नियुक्तीपत्राद्वारे ही नियुक्ती जाहीर केली.
संघटनेच्या राज्यव्यापी विस्ताराला गती देणे, पोलीस बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी संघटनात्मक बळकटी निर्माण करणे आणि समाजहिताची कार्ये अधिक प्रभावीपणे राबविणे या उद्देशाने ही नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
श्रीशेखर साखरे यांच्यावर धाराशिव ग्रामीण भागात संघटनेचे जाळे अधिक मजबूत करणे, पोलीस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा करणे तसेच संघटनेच्या ध्येय-धोरणांचा प्रसार करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर श्रीशेखर विजयानंद साखरे यांनी संघटनेच्या विश्वासास पात्र ठरत पोलीस बांधवांच्या हितासाठी आणि संघटनेच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
त्यांच्या नियुक्तीचे विविध स्तरांतून स्वागत होत असून धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या कार्याला नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 13323