धाराशिव जिल्ह्यात आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा दोन दिवसांचा नियोजित दौरा
धाराशिव दि. 6 : भुम, परंडा व वाशी तालुक्यात विविध स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी माजी मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांचा 7 व 8 नोव्हेंबर रोजी दोन दिवसांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे. या दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांशी संबंधित मुद्द्यांवर तसेच संघटनात्मक समन्वयावर चर्चा होणार असल्याची माहिती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिली.
दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे—
7 नोव्हेंबर 2025 – शुक्रवार
परंडा तालुका ग्रामीण बैठक
वेळ : दुपारी 1.00 वाजता
स्थळ : भैरवनाथ शुगर वर्क्स, सोनारी
परंडा शहर – नगरपरिषद विषयक बैठक
वेळ : सायंकाळी
स्थळ : अध्यक्ष जाकीर सौदागर यांचे निवासस्थान, परंडा
8 नोव्हेंबर 2025 – शनिवार
भुम नगरपरिषद विषयक बैठक
वेळ : सकाळी 11.00 वाजता
स्थळ : साहिल फॅक्शन हॉल, भुम
भुम तालुका ग्रामीण बैठक
वेळ : दुपारी 1.00 वाजता
स्थळ : साहिल फॅक्शन हॉल, भुम
वाशी तालुका ग्रामीण व वाशी शहर संयुक्त बैठक
वेळ : दुपारी 3.00 वाजता
स्थळ : भैरवनाथ शुगर वर्क्स, वाशी
जिल्ह्यातील शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी तसेच संबंधित अंगीकृत पदाधिकाऱ्यांनी नियोजित वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंखे, भुम तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, परंडा तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाघव आणि वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट यांनी केले आहे.





















Total views : 4449