धाराशिव जिल्ह्यात आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या दोन दिवसांच्या दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
( सय्यद कलीम मुसा )
धाराशिव दि. 6 (प्रतिनिधी): भुम, परंडा आणि वाशी तालुक्यातील स्थानिक स्तरावरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्यासाठी माजी आरोग्य मंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या दोन दिवसांच्या नियोजित दौऱ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. 7 आणि 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या बैठका संघटनात्मक समन्वय मजबूत करण्यासाठी आयोजित करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्याचा उद्देश प्रशासनिक व स्थानिक प्रश्नांचा आढावा घेणे आणि पदाधिकारी–कार्यकर्त्यांमधील संवाद अधिक बळकट करणे हा आहे. या बैठका निवडणुकीसंदर्भातील प्रचारकृती नसून, पूर्णपणे संघटनात्मक स्वरूपाच्या असल्याने आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्यात आली आहे.
कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या उत्सुकतेने या बैठकींकडे पाहत असून, आमदार सावंत यांच्या सलग दौऱ्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि चैतन्य निर्माण झाल्याची भावना व्यापकपणे व्यक्त होत आहे.
दौरा कार्यक्रम
७ नोव्हेंबर २०२५ – शुक्रवार (परंडा तालुका)
परंडा तालुका ग्रामीण बैठक
वेळ : दुपारी 1.00
स्थळ : भैरवनाथ शुगर वर्क्स, सोनारी
परंडा शहर – नगरपरिषद विषयक बैठक
वेळ : सायंकाळी
स्थळ : अध्यक्ष जाकीर सौदागर यांचे निवासस्थान, परंडा
८ नोव्हेंबर २०२५ – शनिवार (भुम–वाशी तालुका)
भुम नगरपरिषद विषयक बैठक
वेळ : सकाळी 11.00
स्थळ : साहिल फॅक्शन हॉल, भुम
भुम तालुका ग्रामीण बैठक
वेळ : दुपारी 1.00
स्थळ : साहिल फॅक्शन हॉल, भुम
वाशी तालुका ग्रामीण व शहर संयुक्त बैठक
वेळ : दुपारी 3.00
स्थळ : भैरवनाथ शुगर वर्क्स, वाशी
या दोन दिवसांच्या दौऱ्यातून तालुका–शहर पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संवाद वाढेल, स्थानिक प्रश्नांची मांडणी होईल आणि संघटनात्मक कार्यात अधिक समन्वय साधला जाईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.





















Total views : 4449