धाराशिव प्रभाग ३ मधील कार्यकर्त्यांचा भाजपात सामूहिक प्रवेश; संघटनेत नव्या चेहऱ्यांची भर
धाराशिव: सय्यद कलीम मुसा
धाराशिव शहरातील प्रभाग क्र.३ येथील अनेक कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात सामूहिक प्रवेश सोहळा पार पडला. सामाजिक उपक्रमांत सक्रिय असलेल्या तरुणांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवत पक्षात प्रवेश जाहीर केला. नव्याने सामील झालेल्या सदस्यांना संघटनात्मक कार्यपद्धतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
हा प्रवेश सोहळा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
प्रवेश करणाऱ्यांमध्ये ओमकार वाघमोडे, अजिंक्य चव्हाण, सागर पवार, यश थोरबोले, ओंकार जाधव, संदीप घुले, सौरभ घुले, रणवीर भालेराव, आतिश धुमाळ, शंतनु शिंदे, स्वप्निल घाटोळे, दीपक मगर, नितीन भोसले, शुभम धस, यश राठोड, नितीन माने, पवन गरडे, महेश जगताप, तुषार राठोड, संदीप चव्हाण, इकबाल सय्यद, गणेश सोनटक्के, रामेश्वर सोनटक्के, अनिकेत शिंदे, प्रकाश पोळ, सोहेल शेख, विठ्ठल गाटे यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे समन्वयन संदीप इंगळे व सुशांत सोनवणे यांनी केले. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून शहराच्या विकासाशी निगडित विविध विषयांवर जबाबदारीने योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे, अमित शिंदे, संदीप इंगळे, सुशांत सोनवणे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.





















Total views : 4449