धाराशिव नगरपरिषद निवडणुकीची लगबग; शहरात ‘संयमी नेतृत्वा’ची चर्चेत वाढ…!!
थंडीत शहरात राजकारणाला उष्णतेची किनार ..!!
धाराशिव दि. — ( सय्यद कलीम मुसा ):
धाराशिव नगरपरिषद निवडणुकांच्या दिशेने राजकीय हालचाली वेग घेत असून शहरातील वातावरण दिवसागणिक तापू लागले आहे. पक्षांमध्ये नियोजन, आंतरिक चर्चा आणि पुढील रणनीतींसंबंधी हालचाली शांतपणे सुरू असल्या तरी शहरात राजकारणाला उष्णतेचा किनारा दिसू लागला आहे.
काही कार्यकर्त्यांमध्ये अशी चर्चाही पुढे येताना दिसत आहे की, “नगरपरिषदधाराचे रन धुमाळी लवकरच उडेल आणि सध्याच्या परिस्थितीत संयमी व दूरदृष्टी असलेले आमदार राणाजगजीतसिंह पाटील महत्त्वाची भूमिका बजावू शकतील”, असे नागरीकातून बोलले जात आहे.
शहरातील कोणत्याही पक्षाने अद्याप अधिकृत घोषणा किंवा उमेदवारीसंबंधी भूमिका स्पष्ट केलेली नाही. तरीही विविध गटांतील नियोजन, संवाद आणि संभाव्य बदलांच्या हालचालींमुळे धाराशिवच्या राजकीय पटावर उत्सुकतेचा रंग गडद होत चालला आहे.
आगामी निवडणुकांचा कालावधी लक्षात घेता सर्व पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आचारसंहितेची चौकट पाळत संयमी पद्धतीने पुढील बैठका व चर्चा पार पाडत आहेत.
धाराशिव नगरपरिषद निवडणुकीत कोणते समीकरण पुढे येते, कोणती नवी सक्रियता दिसते आणि राजकीय वातावरणाला कोणता वेग मिळतो याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.





















Total views : 4449