हातलाई शुगरच्या गूळ पावडरच्या पहिल्या आकरा पोत्याचे पूजन
कळंब : जवळा (खुर्द ) ता.कळंब येथील हातलाई शुगर प्रा .लिमिटेड या कारखान्याचे सन 2025 या चालू गळीत हंगामातील पहिल्या जॉगरी पावडर अर्थात गूळ पावडरच्या पहिल्या पोत्याचे काल दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी पूजन आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हा संघटक सुधीर (अण्णा)पाटील व कारखान्याचे चेअरमन तथा युवा उदयोजक व शिवसेना युवा नेते अभिराम सुधीर पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
या वेळी अध्यक्ष सुधीर पाटील यांनी परिसरातील शेतकऱ्यां ना ऊसाचा रास्त भाव देऊ असे आश्वासन दिले तर कारखान्याचे चेअरमन अभिराम पाटील यांनी कारखान्याच्या माध्यमातून या परिसरातील शेतकऱ्याची आर्थिक स्थिती अधिक समृद्ध करू , अशी ग्वाही दिली .
या वेळी अमोल शेळके , साहेबराव देशमुख , किसन हजारे ,इस्माइल शेख तसेच कारखान्याचे जनरल मॅनेजर रोंगे साहेब , चिफ केमिस्ट फुलचंद शेळके , चिफ मॅनेजर मुंडे साहेब , विनोद पुजारी,क्षीरसागर,गायकवाड व सर्व कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 4448