डिकसळ पंचायत समिती निवडणूक : इम्रान नजमोद्दीन मुल्ला यांचा शिवसेनेकडे उमेदवारी अर्ज
कळंब | प्रतिनिधी
डिकसळ ग्रामपंचायत सदस्य तसेच दयावान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष इम्रान नजमोद्दीन मुल्ला यांनी आगामी डिकसळ पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून उमेदवारी मिळावी, यासाठी अधिकृतपणे इच्छुक उमेदवारी अर्ज सादर केला आहे.
हा अर्ज शिवसेना संपर्क कार्यालय, कळंब येथे शिवसेनेचे लोकनेते अजित दादा पिंगळे यांच्याकडे सादर करण्यात आला. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करताना डिकसळ गावातील पायाभूत सुविधा, सामाजिक उपक्रम, युवक-शिक्षण व विकासकामांसाठी इम्रान मुल्ला यांनी सातत्याने पुढाकार घेतला आहे. दयावान प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी समाजोपयोगी उपक्रम राबवून नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
डिकसळ परिसराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. आगामी निवडणुकीसाठी नागरिकांचा पाठिंबा व आशीर्वाद अपेक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.





















Total views : 4449