जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण जनतेचा खा ओमराजे निंबाळकर यांच्याकडे वाढता कल .
धाराशिव जिल्ह्यात ओमराजे निंबाळकरांची ‘चालती हवा’
धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव जिल्ह्यासह सर्व तालुक्यांमध्ये सध्या एकच नाव चर्चेत आहे—ते म्हणजे ओमराजे निंबाळकर. “काय बोलतो रे भावा!” अशी प्रतिक्रिया उमटेल इतकी त्यांची चालती हवा सध्या राजकीय वर्तुळातच नव्हे तर सामान्य जनतेमध्येही पाहायला मिळत आहे.
अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात वातावरण चांगलेच तापले असून, या राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी ओमराजे निंबाळकर असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. गावोगावच्या चर्चांमधून, चहाच्या टपऱ्यांपासून ते शेतशिवारापर्यंत, ओमराजेंच्या कार्यपद्धतीबाबत आणि त्यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक चर्चा ऐकायला मिळत आहे.
ग्रामीण जनतेचा खोल आणि नैसर्गिक ओढा ओमराजे निंबाळकरांकडे वाढताना दिसत असून, विकासाभिमुख भूमिका, जनतेशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवरील ठाम भूमिका यामुळे त्यांच्याविषयी विश्वास अधिक दृढ होत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे तरुण वर्ग, शेतकरी आणि सामान्य नागरिकांमध्ये ओमराजे निंबाळकरांविषयी उत्सुकता आणि आपुलकी दिसून येत आहे. “आपला माणूस” अशी ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी ठरत असल्याची चर्चा सध्या ग्रामीण भागात ऐकू येत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर निर्माण झालेली ही सकारात्मक लाट आगामी राजकीय समीकरणांवर काय परिणाम घडवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत, धाराशिव जिल्ह्यात ओमराजे निंबाळकरांचीच हवा असल्याचे चित्र स्पष्टपणे जाणवत आहे.




















Total views : 4448