• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, March 4, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

धाराशिव कला केंद्रातील नर्तिकांची हाक : “दोषींवर कारवाई करा; पण आमच्यावर उपासमारी ओढवू नका”

Sayyad Musa by Sayyad Musa
February 24, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

धाराशिव कला केंद्रातील नर्तिकांची हाक : “दोषींवर कारवाई करा; पण आमच्यावर उपासमारी ओढवू नका”
धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव येथील कला केंद्रांमध्ये काम करणाऱ्या नर्तिकांनी प्रशासनाकडे भावनिक आवाहन करत आपल्या उदरनिर्वाहाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. “आम्ही कला सादर करून प्रामाणिकपणे उपजीविका करतो. काही ठिकाणी अनियमितता आढळत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करा; मात्र संपूर्ण केंद्र बंद करून आमच्यावर उपासमारीची वेळ आणू नका,” अशी हात जोडून विनंती नर्तिकांनी केली.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवाईमुळे अनेक कला केंद्रांचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या नर्तिकांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. “आमच्या मागे आमची कुटुंबे आहेत. घरातील लहान मुले आणि वृद्ध आई-वडील आमच्यावर अवलंबून आहेत. काम बंद असल्याने घर चालवणे कठीण झाले आहे,” अशी व्यथा त्यांनी व्यक्त केली.
नर्तिकांनी स्पष्टपणे सांगितले की, शासनाने घालून दिलेले सर्व नियम व अटी पाळण्याची त्यांची तयारी आहे. “तुम्ही नियम ठरवा, आम्ही त्यानुसार काम करू. कायद्याच्या चौकटीत राहून कला सादर करू; पण आम्हाला कामाची संधी द्या,” अशी त्यांची भूमिका आहे.
“जे कुणी चुकीचे कृत्य करत असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी. मात्र एका-दोन जणांच्या चुकीमुळे सर्व कलाकारांवर अन्याय होऊ नये. आम्हालाही जगण्याचा हक्क आहे. आमच्या कलेला बंदी नव्हे, तर योग्य दिशा द्या,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, प्रशासनाने या प्रकरणाकडे सहानुभूतीपूर्वक पाहून लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. कला केंद्रांना नियमबद्ध पद्धतीने सुरू करण्यास परवानगी मिळाल्यास अनेक कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागेल, असा नर्तिकांचा विश्वास आहे.
या भावनिक मागणीमुळे धाराशिव शहरात चर्चा रंगली असून, प्रशासन पुढे कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषदेत राजकीय भूकंप!आमिषाला थारा नाही; महेंद्र धुरगुडे ठाम — भाजपसोबतच राहणार

Next Post

विश्वास आणि पारदर्शकतेचा गौरव: जनहित पतसंस्थेला दिपस्तंभ पुरस्कार

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

विश्वास आणि पारदर्शकतेचा गौरव: जनहित पतसंस्थेला दिपस्तंभ पुरस्कार

जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

औसा येथे ७ वर्षीय शेख आनफ खूदूस याचा पहिला रोजा पूर्ण

March 2, 2026

जिल्ह्यात वाढत्या हृदयविकाराच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधा!

February 27, 2026

विश्वास आणि पारदर्शकतेचा गौरव: जनहित पतसंस्थेला दिपस्तंभ पुरस्कार

February 27, 2026

धाराशिव कला केंद्रातील नर्तिकांची हाक : “दोषींवर कारवाई करा; पण आमच्यावर उपासमारी ओढवू नका”

February 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
003380
Total views : 5931

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In