• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, June 15, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

“संकट कोणतंही असो, आमदार कैलास पाटील नेहमीच जनतेच्या पाठीशी!”

Sayyad Musa by Sayyad Musa
May 3, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
126
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

“ट्रान्सफॉर्मरला भीषण आग; अंधारात बुडालेल्या कळंबला उजेड देण्यासाठी आमदार कैलास पाटील स्वतः आग विझवण्यासाठी मैदानात, अधिकाऱ्यांना विचारला जाब

कळंब (प्रतिनिधी) : कळंब शहरात काल दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागल्याने संपूर्ण शहराचा वीजपुरवठा खंडित झाला. आग भीषण स्वरूपाची असल्याने ती नियंत्रणात आणण्यासाठी तब्बल १६ तास लागू शकतात, असा अंदाज सुरुवातीला व्यक्त करण्यात येत होता. मात्र, स्थानिक आमदार कैलास पाटील यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यात यश आले आणि शहराचा वीजपुरवठा अल्पावधीतच पूर्ववत करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच आमदार कैलास पाटील स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्काळ संबंधित यंत्रणेशी समन्वय साधत आग नियंत्रणासाठी आवश्यक साहित्य आणि मनुष्यबळ उपलब्ध करून दिले. तसेच पर्यायी व्यवस्था उभारून इतर ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून शहराला वीजपुरवठा सुरू करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे मोठा संभाव्य धोका टळला. दरम्यान आग इतकी मोठी होती की आग विझवण्यासाठी लोहारा आणि सोलापूर जिल्ह्यातील अग्निशमन दलाच्या गाड्या आमदार कैलास पाटील यांनी फोन करून मागवल्या. आमदार कैलास पाटील यांच्या तत्परतेमुळे आगीवर नियंत्रण तर मिळालेच मात्र अंधारात जाणाऱ्या कळंबला देखील उजेड देण्याचे काम आमदार पाटील यांनी केलं.

दरम्यान, सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वीजपुरवठा खंडित राहिल्यास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच रुग्णालयातील रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागला असता. याशिवाय, NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणी निर्माण झाल्या असत्या. मात्र, वेळेवर करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे ही सर्व परिस्थिती टळली.

या घटनेत काही विरोधक घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीचा आढावा घेत निघून गेल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात संकटाच्या वेळी प्रशासनाशी समन्वय साधत काम करून दाखवणारा लोकप्रतिनिधी कोण, याचा प्रत्यय नागरिकांना आला.

कळंब शहरातील नागरिकांनी आमदार कैलास पाटील यांच्या तत्परतेचे कौतुक करत त्यांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले आहे. संकटाच्या काळात वेगाने निर्णय घेऊन अंमलबजावणी केल्यास मोठे नुकसान टाळता येते, याचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.

Previous Post

वाशी येथे ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ कार्यशाळा उत्साहात संपन्न

Next Post

अनुसूचित जाती उप वर्गीकरण संदर्भात ५ मे रोजी बैठकीचे आयोजन – शिंगाडे

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

अनुसूचित जाती उप वर्गीकरण संदर्भात ५ मे रोजी बैठकीचे आयोजन - शिंगाडे

मध्य रेल्वेचा सर्वात मोठा 'सिंगल स्पॅन' पूल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

June 3, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

खड्ड्यांवर फक्त चर्चा नाही, कृतीही हवी!; पोलीस निरीक्षक शेख यांनी मध्यरात्री स्वतः पुढाकार घेत बुजवले जीवघेणे खड्डेकळम प्रतिनिधी

June 15, 2026

विकास, संघटन आणि जनहिताचा निर्धार; भूम-परंडा-वाशीतील आढावा बैठकीत सावंत यांचा स्पष्ट संदेश

June 15, 2026

ग्रेट भेटीतून विकासाच्या नव्या पर्वाची चाहूल; तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर मान्यवरांचा ठाम विश्वासपुणे | प्रतिनिधी

June 15, 2026

धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषदेसाठी महायुतीची ताकद वाढली; जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांची बसवराज पाटील यांना सदिच्छा भेट

June 13, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वडार समाजाच्या प्रश्नांवर मंत्रालयात निर्णायक बैठकमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार आढावा; समाजाच्या मागण्यांवर तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
008869
Total views : 14008

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In