आईच्या त्यागाला सलाम; मातृदिनानिमित्त जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांचा भावनिक संदेश
धाराशिव | प्रतिनिधी
“आई म्हणजे निस्वार्थ प्रेम, अथांग माया आणि आयुष्यभराची प्रेरणा,” अशा भावपूर्ण शब्दांत जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी जागतिक मातृदिनानिमित्त सर्व मातांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आई ही प्रत्येक कुटुंबाचा मजबूत आधारस्तंभ असून तिच्या संस्कारांनी आणि अथक कष्टांनी समाज घडत असतो. जीवनातील प्रत्येक संकटात धीर देणारी, मुलांच्या यशासाठी स्वतःच्या आनंदाचा त्याग करणारी आई हीच खरी प्रेरणास्थान असल्याचे त्यांनी आपल्या संदेशात नमूद केले.
“आईच्या मायेची आणि त्यागाची किंमत कोणत्याही शब्दांत व्यक्त होऊ शकत नाही. तिचे ऋण कधीही फेडता येणार नाही,” असे सांगत समाजातील सर्व मातांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
जागतिक मातृदिनानिमित्त विविध स्तरांतून मातांना शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या या भावनिक संदेशाची नागरिकांमध्ये विशेष चर्चा होत आहे.
#जागतिक_मातृदिन #मातृदिन
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 12294