रंगीला चौकातील रस्त्यावर पडलेली खडी हटवून वाहतूक सुरळीत नगरसेवक अमर बाबू चाऊस यांचा पुढाकार; अमोल जगताप व देवा गायकवाड यांचे सहकार्य
कळंब : शहरातील वर्दळीच्या रंगीला चौक परिसरात तांदळवाडीहून येणाऱ्या खडी क्रेशरच्या गाड्यांमधून मोठ्या प्रमाणात खडी रस्त्यावर सांडली होती. मागील चार ते पाच दिवसांपासून ही खडी रस्त्यावरच पडून असल्यामुळे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेषतः दुचाकीस्वारांच्या गाड्या वारंवार स्लीप होत असल्याने परिसरात अपघाताचा धोका निर्माण झाला होता. नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित विभागाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली होती. मात्र या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
दरम्यान, ही बाब नगरसेवक अमर बाबू चाऊस यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. कोणत्याही कर्मचाऱ्यांची किंवा यंत्रणेची वाट न पाहता त्यांनी स्वतः पुढाकार घेत रस्त्यावर पडलेली खडी जमा करण्याचे काम सुरू केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमोल जगताप व देवा गायकवाड यांनीही सहकार्य करत रस्त्यावरची खडी बाजूला करण्यासाठी मेहनत घेतली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी खडी हटविण्यात आली व रस्ता पुन्हा सुरक्षित करण्यात आला.
स्थानिक नागरिकांनी नगरसेवक अमर बाबू चाऊस यांच्या तत्परतेचे कौतुक केले असून, लोकप्रतिनिधींनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणे आवश्यक असल्याची भावना व्यक्त केली. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्वतः रस्त्यावर उतरून काम करणाऱ्या अमर बाबू चाऊस तसेच सहकार्य करणारे अमोल जगताप व देवा गायकवाड यांच्या कार्याचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत आहे.



















Total views : 12294