नंदिकेश्वर यात्रेनिमित्त म्हैसगावात निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान
कुस्ती शौकिनांची मोठी गर्दी; धनंजय दादा सावंत यांची उपस्थिती
म्हैसगाव, ता. माढा | प्रतिनिधी
म्हैसगाव येथे नंदिकेश्वर यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पारंपरिक कुस्ती संस्कृतीची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या मैदानात परिसरातील नामांकित मल्लांनी दमदार झुंजी देत उपस्थितांची दाद मिळवली.
यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या या कुस्ती मैदानासाठी पंचक्रोशीतील नागरिक, कुस्तीप्रेमी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. मैदानात रंगलेल्या चुरशीच्या लढतींमुळे वातावरणात विशेष उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी धाराशिव जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी उपस्थित राहून कुस्ती मैदानाचा आनंद घेतला. त्यांनी आयोजकांच्या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील पारंपरिक खेळांना प्रोत्साहन देणे काळाची गरज असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. यात्रेनिमित्त गावात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.






















Total views : 12297