सारोळा येथे विवाह सोहळा उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
वाशी | प्रतिनिधी
सारोळा येथील युवासेनेचे उपतालुकाप्रमुख सुनील मोरे यांच्या बहिणीच्या विवाह सोहळ्याचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवदाम्पत्याला नवीन आयुष्यासाठी शुभेच्छा देत त्यांच्या भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब मांगले, शिवसेना उपतालुकाप्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समिती वाशीचे संचालक विकास तळेकर, वाशी पंचायत समितीचे उपसभापती नितीन रणदिवे, बप्पा शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
विवाह सोहळ्यात नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी मोरे परिवाराचे अभिनंदन करत नवदाम्पत्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 12297