विकासाच्या ध्यासातून जनतेच्या मनात निर्माण केले वेगळं स्थान
कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाची सर्वत्र चर्चा
भूम-परंडा-वाशी मतदारसंघाच्या राजकारणात आपल्या कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण करणारे विकासरत्न कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी समाजकारण आणि विकासकामांचा अनोखा संगम घडवत जनतेच्या मनात विश्वासाचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे शिवजल क्रांतीसारख्या महत्त्वाकांक्षी उपक्रमातून ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडवण्याचा धाडसी प्रयत्न करत त्यांनी विकासाची नवी दिशा दिली. दुष्काळी परिस्थितीशी सामना करणाऱ्या गावांसाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण झाली.
महिलांशी जिव्हाळ्याचं नातं, युवकांमध्ये नेतृत्वाविषयी विश्वास आणि कार्यकर्त्यांमध्ये कामाची प्रेरणा निर्माण करत त्यांनी स्वतःचा मजबूत आणि निष्ठावान कार्यकर्ता वर्ग उभा केला. राजकारणातील सूक्ष्म जाण, संघटन कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका यामुळे त्यांनी अल्पावधीत राज्याच्या राजकारणात स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले.
संघर्षमय प्रवासातून पुढे येत त्यांनी मंत्रीमंडळात आपले स्थान पक्के केले आणि मतदारसंघाचा आवाज विधानभवनात प्रभावीपणे पोहोचवला. मागासलेल्या भागांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणत रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आणि इतर मूलभूत सुविधांच्या कामांना गती दिली. “विकास हा केवळ आश्वासनांचा विषय नसून तो प्रत्यक्षात दिसला पाहिजे,” ही भूमिका घेत त्यांनी स्वच्छ आणि पारदर्शक विकासकामांचा आदर्श उभा केला.
राजकीय वाटचालीसोबतच सामाजिक बांधिलकी जपत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सदैव तत्पर राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारा नेता म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात वेगळी छाप पाडली आहे.
भविष्यातही त्यांचे कार्य अधिक व्यापक, जनहितकारी आणि प्रेरणादायी ठरावे, अशी भावना कार्यकर्ते आणि नागरिकांमधून व्यक्त होत असून विठुरायाच्या चरणी त्यांच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी प्रार्थना केली जात आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12313