सारिकाताई अंधारे यांच्या वडिलांच्या निधनाने हळहळ; काटेगाव येथे सांत्वनपर भेट
बार्शी : शिवसेना महिला आघाडी परंडा तालुका प्रमुख सौ. सारिकाताई अंधारे यांच्या वडिलांच्या निधनाची बातमी समजताच विविध स्तरांतून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मौजे काटेगाव (ता. बार्शी) येथे त्यांच्या निवासस्थानी जाऊन गाढवे परिवाराची सांत्वनपर भेट घेण्यात आली. यावेळी दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली तसेच दुःखद प्रसंगी कुटुंबियांचे सांत्वन करण्यात आले.
“वडिलांचे छत्र हरपणे ही आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी असते,” अशा शब्दांत भावना व्यक्त करत दिवंगत आत्म्यास सद्गती लाभावी आणि गाढवे परिवारास या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना करण्यात आली.
आई तुळजाभवानी मातेच्या चरणी दिवंगत आत्म्यास शांती लाभो, अशी भावपूर्ण प्रार्थनाही यावेळी करण्यात आली.
या दुःखद प्रसंगी नातेवाईक, मित्रपरिवार, शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून गाढवे परिवाराच्या दुःखात सहभाग नोंदविला.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12319