वालवड सर्कलमध्ये गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद; जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद
भूम : “तुमच्या भेटीला… तुमच्या सेवेसाठी” या संकल्पनेतून वालवड सर्कल परिसरात आयोजित गावभेट दौऱ्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. धाराशिव जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते तथा भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा राबविण्यात येत असून ग्रामीण भागातील नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला जात आहे.
भूम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विशाल बापू ढगे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या दौऱ्यामध्ये विविध गावांतील नागरिकांच्या अडचणी, विकासकामांच्या मागण्या तसेच शासकीय योजनांबाबत चर्चा करण्यात येत आहे. गावपातळीवरील प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
या दौऱ्यात भूम पंचायत समिती सभापती सौ. पूजा विशाल ढगे, पंचायत समिती सदस्य सौ. साधना शंकर सुबुगडे तसेच जिल्हा परिषद सदस्य सौ. जयश्रीताई बालाजी काळे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत नागरिकांशी संवाद साधला.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची भूमिका आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने राबविली जात असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
दरम्यान, “प्रा. डॉ. तानाजीराव सावंत युवा मंच”च्या माध्यमातूनही युवक मोठ्या संख्येने या गावभेट दौऱ्यात सहभागी होत असून गावागावांत संघटनात्मक बळकटीसह जनसंपर्क वाढविण्यावर भर दिला जात आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 13796