• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Monday, May 25, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

अवैध विदेशी दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

Sayyad Musa by Sayyad Musa
May 22, 2026
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

अवैध विदेशी दारू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई

६ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; दोन आरोपींवर गुन्हा दाखल

धाराशिव, प्रतिनिधी : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने आणखी एक मोठी कारवाई करत अवैध विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इनोव्हा कारसह तब्बल ६ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. २१ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांचा तपास, फरारी आरोपींचा शोध तसेच अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्त घालत होते. यावेळी येडशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात असताना पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इनोव्हा कार (क्र. एमएच १५ बीएक्स ६८२०) मधून अवैध विदेशी दारूची चोरटी वाहतूक केली जात आहे.

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने सापळा रचला व संशयित वाहन अडवले. वाहन चालकाने आपले नाव सुभाष भिमराव उर्फ लाला काळे (वय ३३, रा. कन्हेरवाडी, ता. कळंब) असे सांगितले. तर वाहनातील दुसऱ्या व्यक्तीने आपली ओळख दादा रामा काळे (वय ४६, रा. जुना बस डेपो परिसर, पारधी पिढी, धाराशिव) अशी दिली.

वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारूच्या बाटल्यांनी भरलेले बॉक्स आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी इनोव्हा कार आणि विदेशी दारू असा एकूण ६ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवायांमुळे संबंधितांमध्ये खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई

ही कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक , सपोनि अमोल मोरे, पोहेकॉ बळीराम शिंदे, अमोल चव्हाण व चालक पोकाॅ दहीहांडे यांच्या पथकाने पार पाडली.

Previous Post

माजी जिल्हा परिषद सदस्य अनंद पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची घेतली सदिच्छा भेट

Next Post

गिरीराज सावंत यांची धाराशिव शिष्टमंडळासोबत विकास विषयांवर चर्चा

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

गिरीराज सावंत यांची धाराशिव शिष्टमंडळासोबत विकास विषयांवर चर्चा

नवलगावमध्ये गावभेट दौरा; नागरिकांच्या समस्या जाणून घेत विकासाचा आराखडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

विंडो मॅजिकचे आशियातील सर्वात मोठ्या शहरी पुनर्विकास प्रकल्पात योगदान; मुंबईतील वरळी येथील बीडीडी चाळ

May 25, 2026

बसस्थानकातील दुचाकी चोरट्यांना बेड्या; स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई,

May 24, 2026

२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा

May 24, 2026

मौजे शेंडी येथे तीन दिवसांपासून डीपी पडलेली; नागरिकांचा संताप, तातडीने दुरुस्तीची मागणी

May 24, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
007620
Total views : 12315

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In