प्रभाग क्रमांक १९ मध्ये उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश .
राणाजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पक्ष प्रवेश .
धाराशिव शहरातील प्रभाग क्रमांक १९ मध्ये मोठा राजकीय उबाठा पाहायला मिळाला. उबाठा सेनेचे प्रमुख कार्यकर्ते श्री. बापू देशमुख, श्री. राहुल भांडवले, श्री. दत्ता देशमुख यांनी अनेक शिवसैनिकांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
या प्रवेश सोहळ्याच्यावेळी सर्व नवागतांचे भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
“भारतीय जनता पार्टीच आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करू शकते, हा विश्वास जनतेच्या मनात दृढ होत आहे. त्यामुळेच पक्षप्रवेशाचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे,” असे उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास श्री. अभय इंगळे, श्री. इंद्रजित देवकते, श्री. संभाजी सलगर, श्री. अमित पडवळ, श्री. किशोर पवार, श्री. सुरज शेरकर यांच्यासह भाजपचे अनेक प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक १९ मधील या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले असून, कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. आमदार राणाजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि विकासाच्या ध्येयासाठी एकजुटीने काम करण्याची तयारी स्पष्टपणे दिसून आली.























Total views : 4449