“धाराशिव जिल्हा शिवसेना प्रभारीपदाची जबाबदारी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंताकडे .
➡️ जिल्ह्याच्या राजकारणात नव्या उर्जेचा संचार..!”
धाराशिव : सय्यद कलीम मुसा
भुम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे विकासाचे शिल्पकार, लोकहितासाठी सदैव तत्पर राहणारे, जनतेच्या मनात विश्वासाचं स्थान निर्माण केलेले कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांची शिवसेना पक्षाकडून धाराशिव जिल्हा प्रभारीपदी निवड करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
शिवसेना पक्षाने सावंत साहेबांच्या संघटनशक्तीचा, कार्यतत्परतेचा आणि समन्वय कौशल्याचा योग्य सन्मान करत जिल्ह्याच्या जबाबदारीची धुरा त्यांच्या खांद्यावर सोपवली आहे. सावंत साहेब यांनी यापूर्वी मंत्री म्हणून आणि आमदार म्हणूनही अनेक विकासकामे राबवून शासन आणि जनतेत विश्वासाचं नातं दृढ केलं आहे.धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये या नियुक्तीमुळे उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून, आगामी स्थानिक निवडणुकांसाठी संघटन अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.सावंत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पक्षाच्या शिस्तीने, विकासाच्या ध्येयाने आणि जनतेच्या हितासाठी पार पाडल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
— त्रिशक्ती वार्ता





















Total views : 4449