सौ. स्वाती गोरख जोगदंड
रा. पिंपळगाव कमलेश्वरी, ता. वाशी, जि. धाराशिव
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षासाठी आपण आजपर्यंत केलेल्या निष्ठावंत, सक्रिय आणि सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत, वाशी तालुका महिला अध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.
पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक भक्कम करण्यासाठी तसेच पक्षाची विचारधारा सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपण उत्साह, कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाने कार्य कराल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पक्षाचे ध्येय–धोरणे आणि आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे विचार अधिक व्यापकपणे जनमानसात पोहोचविण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील राहाल, अशी अपेक्षा आहे.
आपल्या या नियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन तसेच पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
–





















Total views : 4449