काँग्रेस पक्षाच्या शरयु आनंद गावडे यांनी प्रभाग ६ मध्ये दिले सर्वपक्षीयांना तगडे आव्हान..!!
➡️ खा प्रणिती शिंदे यांच्या सभेने प्रभागातील समिकरणे बदलणार ‘
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ:- मोहोळ नगरपरिषद २०२५ च्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ६ मधून गावडे परिवाराच्या स्नुषा शरयू आनंद गावडे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घेत सर्वसामान्य मतदारांच्या पाठबळावर आणि प्रगल्भ वैचारिक क्षमतेच्या जोरावर सर्वपक्षीय दिग्गजांना प्रचारात प्रचारात निष्प्रभ ठरवत निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने निर्णायक आघाडी घेतली आहे. यापूर्वी त्यांचे दीर अतुल गावडे यांनी प्रभागाचे प्रतिनिधित्व नगरपरिषद केले आहे. गावडे परिवाराने राजकीय क्षेत्राबरोबर सामाजिक क्षेत्रातही आपल्या अवलौकिक कायार्चा ठसा उमटवल्यामुळे यावेळी कोणी कितीही प्रभागात दबावाचे आणि अन्य बाबींचे राजकारण केले तरी पुन्हा गावडे परिवारातील सदस्याला संधी द्यायचीच असा दृढ निश्चय या प्रभागातील जनतेने केल्याचे जाणवत आहे.
त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढत आहेत. अत्यंत प्रभावी आणि भावनिक साद घालत महिलांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. महिलांच्या प्रगती करता आणि आर्थिक विकासावर भर देण्याचे आश्वासन देत लोकांना मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. लोकांना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी, स्वच्छता, पाणीपुरवठा या अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याचे आश्वासन यांच्या प्रचारात प्रभावीपणे देण्यात येत आहे .
चौकट : – –
पुण्यश्लोक अहिल्यादेवी महिला क्रेडिट कार्ड ऑफ सोसायटी ली, मोहोळ या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा असलेल्या शरयू आनंद गावडे यांनी विकासाच्या मुद्द्यावर सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक भाईचारा जपत प्रचारात आघाडी घेतली आहे. सध्याची ड्रेनेज आणि पाणीपुरवठा कामे दजेर्दार करून घेणे, शहरातील मेन रोडचे काँक्रीटीकरण व सुशोभिकरण करणे अशा महत्वाच्या कामाला प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी त्यांनी प्रभाग क्रमांक ६ मधून हाताच्या पंजाच्या पुढे बटण दाबून प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.





















Total views : 4449