सौ. राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांच्या प्रचार फेरीचा एक वार ; विरोधक पडले एकदम गार!
कळंब | सय्यद कलीम मुसा
कळंब : – नगर परिषद कळंब येथे महायुती व मित्रपक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे यांच्या प्रचार फेरीने शहरात चांगलाच उत्साह निर्माण केला आहे.
“एक फेरी—विरोधकांवर भारी!” अशी चर्चा सध्या कळंबकरांत रंगताना दिसत आहे.
कळंब शहरात सकारात्मक बदलाची नवी हवा वाहू लागली असून, केंद्र व राज्यात सत्तेवर असलेल्या नेतृत्वाच्या बळावर शहराचा विकास झपाट्याने पुढे जाईल, असा जनतेत विश्वास निर्माण होत आहे.
“शहराचा विकास हा आमचा संकल्प, आश्वासनांची फक्त घोषणाबाजी नाही” कापसे प्रचार सभेत बोलताना सौ. कापसे म्हणाल्या की,“माझे पती श्री. शिवाजी आप्पा कापसे यांनी अनेक वर्षे तालुका व जिल्ह्यात सक्रिय राहून शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलला. पायाभूत सुविधांमध्ये त्यांनी दिलेल्या योगदानाचा प्रत्येक नागरिक साक्षीदार आहे.”
परंतु, गेल्या काही वर्षांत शहराचा विकास ठप्प झाल्याचे त्या म्हणाल्या.
“खरे विकासकाम न करता, फक्त आश्वासनांची मालिका सुरू राहिली. रस्ते, प्रकाशयोजना, नालेसफाई, कचरा व्यवस्थापन अशा मुलभूत गरजांकडे स्पष्टपणे दुर्लक्ष झाले. नागरिकांचा त्रास वाढत गेला,” असा थेट जनतेच्या वेदनेचा सूर त्यांनी व्यक्त केला.“खोटी आश्वासने नाही… काम करून दाखवण्याची तयारी!”
सौ. कापसे यांनी स्पष्ट केले की,
“मी मोठी, खोटी वा अपास्तव आश्वासने देऊन जनतेला कधीच दिशाभूल करणार नाही. गेल्या आठ वर्षांत ग्रामविकासाच्या मूलभूत प्रश्नांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. हे चित्र बदलणे हाच माझा संकल्प आहे.”
त्यांनी पुढील कामांसाठी शाश्वत आराखडे जनतेसमोर मांडले शहरातील रस्त्यांचे कायमस्वरूपी नियोजन कचरा उचलण्याची वेळेवर व वैज्ञानिक पद्धती
पावसाळ्यातील नालेसफाईची नियमित व्यवस्था वाढत्या लोकसंख्येला योग्य पायाभूत सुविधा,महिलां—ज्येष्ठ नागरिक—युवकांसाठी स्वतंत्र उपक्रम,आधुनिक नगरपरिषदेची कार्यपद्धती,त्यांच्या शांत, संयमी पण ठाम भाषणाने उपस्थित नागरिकांच्या मनात विश्वासाचे तरंग उमटले.
कळंबकरांमध्ये सकारात्मक लाट विरोधकांत खळबळ
सौ. कापसे यांच्या प्रचार फेरीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी होत असून, ही गर्दी पाहून विरोधकांमध्ये खळबळ उडाल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.
शिस्तबद्ध प्रचार, नेटकं मांडलेला विकास आराखडा आणि नागरिकांशी विनम्र संवाद या तीन मुद्द्यांमुळे त्यांचे जनाधार वाढताना स्पष्टपणे दिसत आहे.
अधिकृत उमेदवार — सौ. राणी उर्फ सुनंदा शिवाजी कापसे ,सौ. कापसे यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याची ग्वाही देत“कळंबचा विकास म्हणजे प्रत्येक नागरिकाचा विकास” असा सकारात्मक संदेश दिला.





















Total views : 4449