प्रभाग १० मध्ये नागरिकांच्या भेटीगाठींना आला वेग ; आनंद जगताप यांच्या संवाद उपक्रमाला नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद .
तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग येत असताना प्रभाग क्रमांक १० मध्ये उमेदवार आनंद नानासाहेब जगताप यांच्या नागरिकांशी सुरू असलेल्या संवाद उपक्रमाला स्थानिकांकडून लक्षवेधी प्रतिसाद मिळत आहे. अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झालेले रस्ते, नाल्यांची , पथदिवे आणि पाणीपुरवठ्याचे मुद्दे मांडण्यासाठी नागरिक पुढे येत असून, भेटीदरम्यान विविध भागातून मोठ्या प्रमाणात नागरीकांची उपस्थिती नोंदवली जात आहे.
दरम्यान,जगताप यांनी प्रभागातील अंतर्गत रस्ते, गल्ली–बोळ आणि सुविधांची स्थिती प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांकडून मते जाणून घेतली. स्थानिकांनी प्रभागातील प्रश्न मांडताना “अनेक समस्यांकडे दुर्लक्ष झाल्याने दैनंदिन जीवनावर परिणाम होतो,” अशी भूमिका व्यक्त केली.
नागरिकांच्या सूचनांतील प्रमुख मुद्दे,
वर्षानुवर्षे प्रलंबित रस्त्यांची दुरुस्ती,
पथदिव्यांची देखभाल व अंधाराच्या समस्या,पावसाळ्यात तुंबणाऱ्या नाल्यांची समस्या,काही भागांतील अस्थिर पाणीपुरवठा,अंतर्गत गल्ल्यांतील मूलभूत कामांतील विलंब. आचारसंहितेच्या अधीन राहून उमेदवारांनी केवळ समस्या ऐकून घेणे आणि त्या संदर्भातील माहितीची नोंद करणे इतपतच मर्यादा पाळल्या आहेत. नागरिक–उमेदवार संवादाला वाढती उपस्थिती मिळत असल्याने प्रभाग १० मधील प्रत्यक्ष अडचणी आणि त्याबाबतच्या अपेक्षा अधिक स्पष्टपणे समोर येत आहेत.
प्रभागातील या वाढत्या हालचालींमुळे तुळजापूर शहराचे लक्ष पुन्हा प्रभाग क्रमांक १० कडे वेधले गेले आहे.





















Total views : 4449