• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Wednesday, April 29, 2026
  • Login
Dare | Dream
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
    • धार्मिक
    • संपादकीय
    • नोकरी विषयक
    • शेत-शिवार
No Result
View All Result
Dare | Dream
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • देश-विदेश
  • राजकीय
  • आणखी
Home ताज्या बातम्या

टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का?” रवींद्र वाघमारेंचा भाजपला खोचक टोला; ‘धाराशिव 2.0’ कनेक्शनवरून

Sayyad Musa by Sayyad Musa
December 14, 2025
in ताज्या बातम्या
0
0
SHARES
11
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

“टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का?” रवींद्र वाघमारेंचा भाजपला खोचक टोला; ‘धाराशिव 2.0’ कनेक्शनवरून सवाल

धाराशिव:
“आम्ही ‘धाराशिव २.०’ या फेक पेजवर कारवाईची मागणी करत आहोत, मग त्या ॲडमिनला वाचवायला भाजपचे लोक का पुढे येत आहेत? आणि राहिला प्रश्न टीआरपीचा, तर टीआरपी वाढवायला ते काय ओमराजे आहेत का? ज्यांचे नाव आम्हाला घ्यावे लागेल,” अशा शब्दांत युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांनी भाजपला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.

फेक एक्झिट पोल प्रकरणी ठाकरे गटाने घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर भाजप जिल्हा प्रवक्ते ॲड. नितीन भोसले यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्यावर टीका केली होती. तसेच, “टीआरपीसाठी विरोधक आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव घेतात,” असा आरोप केला होता. या आरोपांचा रवींद्र वाघमारे यांनी खरपूस समाचार घेतला.

नेमकं काय म्हणाले रवींद्र वाघमारे?

“आम्ही आज पत्रकार परिषद घेऊन थेट प्रश्न विचारला की, आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मात्र, हे प्रकरण समोर येताच भाजपचा ‘छुपा पुढाकार’ आणि बचाव करण्याचे प्रयत्न सिद्ध झाले आहेत. मुळात ‘धाराशिव २.०’ आणि तुमचा काय संबंध आहे? आम्ही त्या पेजवर बोललो तर तुम्हाला मिरच्या का झोंबल्या?” असा थेट सवाल वाघमारे यांनी केला आहे.

“आमच्याकडे ‘ओमराजे’ ब्रँड असताना दुसऱ्यांची गरज काय?”

भाजपच्या टीआरपीच्या आरोपावर बोलताना वाघमारे यांनी भाजपला चिमटा काढला. ते म्हणाले, “तुम्ही म्हणता की टीआरपीसाठी आम्ही राणा पाटलांचे नाव घेतो. पण ते काय ओमराजे निंबाळकर आहेत का? आमच्याकडे ओमराजेंसारखे वलयांकित नाव असताना आम्हाला प्रसिद्धीसाठी दुसऱ्यांचे नाव घेण्याची गरजच काय? मुळात ज्यांनी चुकीचा आणि फेक व्हिडिओ प्रदर्शित केला, त्यांना जाऊन विचारा की तुमच्यावर ही वेळ का आली?”

“रडका डाव खेळून काय सिद्ध केलं?”

भाजपवर हल्लाबोल करताना वाघमारे पुढे म्हणाले की, “तुमच्यात पहिल्यापासून समोरासमोर लढण्याची धमक नव्हती. म्हणूनच असले फेक व्हिडिओ तयार करून रडका डाव खेळावा लागला. यातून तुम्ही काय साध्य केले, याचे उत्तर आधी भाजपने द्यावे,” असे आव्हानही त्यांनी दिले आहे.

‘धाराशिव २.०’ च्या फेक एक्झिट पोल प्रकरणानंतर आता भाजप आणि ठाकरे गटातील शाब्दिक युद्ध चांगलेच पेटल्याचे दिसून येत आहे.

Previous Post

धाराशिव मध्यवर्ती सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या सचिवपदी सुधीर देशमुख

Next Post

तुळजापूर : बदनामीचे षडयंत्र रचणारे पोलिसांच्या रडारवर

Sayyad Musa

Sayyad Musa

Next Post

तुळजापूर : बदनामीचे षडयंत्र रचणारे पोलिसांच्या रडारवर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest

शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

January 1, 2026

येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

December 24, 2025

परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

November 19, 2025

December 28, 2025

धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!

0

धाराशिव नगर परिषद निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार – काँग्रेस शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे

0

तेर मधील यावर्षीच्या सर्व मेडिकल प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना सौ.अर्चनाताई पाटील यांच्याकडून एक एक लाखाची मदत..

0

पाडोळी (आ) येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारीचा आढावाअर्चनाताई पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांशी संवाद,

0

तेरखेडा येथे दोन सभामंडपांचा लोकार्पण व भूमिपूजन सोहळा उत्साहात

April 28, 2026

गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक’; तानाजीराव सावंतांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विजय मंत्रभूम | प्रतिनिधी

April 26, 2026

भाजपची राजनीती भेदभावावर आधारित असल्यामुळे ओबीसींची फरपट – भिंगे

April 26, 2026

महाराष्ट्रातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांचा उद्यापासून पासून बेमुदत संप

April 25, 2026

Popular Stories

  • शिंगोली ग्रामपंचायतीतील प्रभावी नेतृत्वाची जिल्हा परिषदेच्या दिशेने वाटचाल .

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरमाळ्याच्या विजय बारकूलचा दुग्ध व्यावसायाची यशोगाथा,नागपूरच्या महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या माफसू पुस्तकात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • परंडा पोलिसांनी आमदार साहेबांशी घातलेली हुज्जत – खपवून घेतली जाणार नाही : तळेकर**

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 0 shares
    Share 0 Tweet 0
  • तुळजापूरच्या जनतेच्या हृदयात अमिट ठसा ..!!पिंटू गंगणे नाव पुसणं कोणाच्या!”

    0 shares
    Share 0 Tweet 0

© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |

web counter
free web counter
005913
Total views : 9948

Website developed by Amol Hadawale | 9702476117

web counter

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • मनोरंजन
  • शेत-शिवार
  • नोकरी विषयक
  • राजकीय
  • संपादकीय
  • क्राईम
  • आरोग्य व शिक्षण

© 2025 Marathi - Website developed by Amol Hadawale | 9702476117 ASH.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In